×

आमच्या बद्दल

‘ज्या आंदोलनाचे वर्तमानपत्र नसते त्या आंदोलनाची स्थिती ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते’, अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्राचे महत्व समजावून सांगितले.

ब्राम्हणांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या बहुजन समाजाला स्वतंत्र करण्यासाठी शासकवर्गासोबत मोठा संघर्ष करावा लागणार आहे व त्यासाठी जनआंदोलन उभे करावे लागेल.या संघर्षामध्ये विजयी होण्यासाठी शासकवर्गाजवळ असलेल्या शस्त्रांच्या तोडीचे शस्त्र आपल्या जवळ असणे अत्यावश्यक आहे. आजच्या तारखेला शासकवर्गाजवळ सर्व प्रकारचे प्रचार-प्रसार माध्यमं हे आधुनिक जगातील शस्त्र आहेत. तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी बहुजन समाजाजवळही प्रचार-प्रसार माध्यमं असायला हवीत ही गोष्ट लक्षात ठेवून दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी पुणे येथुन ‘दैनिक मूलनिवासी नायक’ या स्वतंत्र वर्तमानपत्राचा जन्म झाला. या दैनिकाच्या माध्यममातून बहुजनविरोधी ब्राम्हणांची कटकारस्थाने तसेच देशाची खरी सामाजिक व राजकीय स्थिती जनतेसमोर मांडण्याचे काम सुरू केले.या माध्यमातून बहुजन समाजासाठी हितकारक व ब्राम्हणवाद विरोधी जनमत तयार करण्याचे कार्य अहोरात्र सुरूच आहे. प्रस्थापित ब्राम्हण-बनिया प्रचार माध्यमं बहुजन समाजाच्या खऱ्या प्रश्नांना-मुद्यांना बगल देवून ते नॉनइश्युमध्ये रूपांतरीत करून बहुजन समाजाचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहे. त्याला छेद देते ‘दै. मूलनिवासी नायक’च्या माध्यमातून बहुजन समाजाच्या प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनवला जात आहे. असे केल्याने प्रस्थापित प्रचार माध्यमांना फार मोठा हादरा बसत आहे. हे दैनिक बंद करण्याच्या धमक्या मिळत आहेत, एवढेच नव्हे तर या दैनिकावर ब्राम्हणवाद्यांकडुन हल्ले देखील झाले. यातुन एकच सिद्ध होते की या दैनिकाचे प्रभाव क्षेत्र किती मोठे आहे.

दै.मूलनिवासी नायक या मराठी आवृत्ती नंतर साल २०११ ला उत्तर प्रदेशाच्या लखनऊ येथुन याची हिंदी आवृत्ती देखील सुरू करण्यात आली व गुजरातच्या अहमदाबाद येथुन गुजराती आवृत्ती सुरू झाली. ब्राम्हण-बनिया लोकांसारखा जाहिरातीवर हे दैनिक चालत नाही, उलट विना जाहिरातीने जनतेच्या सहयोगाने हे दैनिक निरंतर सुरू आहे.

आज सर्वात जास्त गतीशील प्रचार माध्यम म्हणुन सोशल मिडीयाकडे बघितले जाते. आता लोक हे वर्तमानपत्रातील बातम्या वाचण्याए बरोबर वेबसाईट व मोबाईल अॅप वरच जास्त वेळ व्यतित करतात. त्यासाठी या दैनिकाचे प्रभाव क्षेत्र आणखी वाढवण्यासाठी प्रिंट सोबतच आपण हे दैनिक वेबसाईट आणि मोबाईल अॅप वर देखील आणत आहोत. आज काल तुम्ही लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसुन देश/जगामध्ये घडणाऱ्या घटनांवरील अपडेट बातमी मिळवु शकता.

या क्रांतिकारी बदलाचा उपयोग आम्ही बहुजन समाजाला ब्राम्हणी व्यवस्था समजविण्यासाठी आणि ब्राम्हणी कटकारस्थानांपासुन बहुजन समाजाला सतर्क करण्यासाठी करीत आहोत. त्या सोबतच बहुजन महापुरूषांच्या त्याग व समर्पणामुळे जे भारतातील बहुजन लोक विदेशात स्थायिक झालेले आहेत त्यांच्यासमोर भारताची वास्तविक परिस्थिती मांडण्याचा देखील प्रयत्न राहील.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्य
लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली?
शरद यादव असतील आगामी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार
एससी-एसटीचा बढतीचा कोटा मागे घेता येणार नाही
भगत सिंग यांना अद्याप शहीद दर्जा नाही !
११ वर्षात ३०० मुलांना अमेरिकेत विकले, प्रत्येकासाठी घेत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper