×

गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण

Published On :    16 Sep 2019
साझा करें:

शोभा डे यांनी उडवली निर्मला सीतारामन यांची खिल्ली



नवी दिल्ली : भारतात निर्माण झालेल्या मंदीवरून सोशल मीडियावरही बरीच टीका होत आहे. तर उपरोधिक विनोद, मीम्ससुध्दा व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो शेअर करत प्रसिध्द लेखिका शोभा डे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.


‘गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण होतेय,’ असा फोटो निर्मला सीतारामन यांच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झाला. हाच फोटो शेअर करत शोभा डे यांनी ‘मला हे आवडलंय,’ असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी निर्मला यांच्यासोबतच केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनासुध्दा टॅग केलं आहे. गोयल यांना टॅग करण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी गेल्या आठवड्यात केलेलं विचित्र विधान होय.


भारतीय रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झालेली पहायला मिळत आहे. रुपयाचा दर पडतो तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच सामान्य लोकांच्या खिशालाही फटका बसतो. 


ज्या अर्थव्यवस्थेचा विकासदर गत आणि विद्यमान दशकात बहुतेक काळ साडेसहा-सात टक्क्यांच्या आसपास किंवा वर होता, तो दर सरत्या आर्थिक तिमाहीमध्ये तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच पाच टक्क्यांपर्यंत घसरला. अनेक क्षेत्रांना मंदीची झळ पोहोचत आहे. वाहननिर्मिती व गृहबांधणी या क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती जवळपास थांबली असून, उलट शेकडोंवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.


आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर प्रसिध्द शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी गणिताचा उपयोग कधीही झाला नसता, असे विधान गोयल यांनी गुरुवारी केले होते. यावर त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर गोयल यांनी सीएसएमटी येथील कार्यक्रमात आपली चूक मान्य केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
देशाचे विभाजन केलेल्या आरएसएसवर बंदी घाला
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper