×

शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव

Published On :    13 Nov 2019
साझा करें:

मूल्यांकन निकषानुसार शाळांची तपासणी नाहीच



मुंबई : राज्यातील सर्व शाळांची र्सवकष तपासणी अवघ्या महिन्याभरात करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही शिक्षण विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील साधारण ९० हजार शाळांच्या तपासणीसाठी विभागाकडे दोन हजार अधिकारी, कर्मचारीही नाहीत.


मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निश्‍चित केलेल्या मूल्यांकन निकषानुसार शाळांची तपासणी झाली नसल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे शाळांची माहिती संकलन करणार्‍या विविध संकेतस्थळांवरही अपुरी माहिती असल्याचे दिसत आहे. केंद्रीय किंवा राज्याच्या संकेतस्थळांवर शाळा माहिती भरतात. त्याची पडताळणी अनेकदा होत नाही. त्यामुळे विविध संकेतस्थळांवरील माहितीमध्ये तफावत आढळली. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय यंत्रणेने कान उपटल्यावर राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांची सविस्तर पाहणी करण्याचे फर्मान सोडले.


आता शंभर टक्के शाळांची तपासणी जिल्हास्तरावर करण्यात यावी अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र ही पाहणी करण्यासाठी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे दिसत आहे. विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांची संख्या ही साधारण ९० हजार आहे. 


अवघ्या महिन्याभरात ही पाहणी करण्यासाठी दिवसाला ४ ते ५ हजार शाळांची तपासणी होणे आवश्यक आहे. विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते केंद्र प्रमुखांपर्यंतची संख्या ही साधारण २ हजार आहे. सर्वच अधिकार्‍यांना नैमित्तिक काम पूर्णपणे बाजूला ठेवून शाळांची तपासणी करणे शक्य नाही.


शाळेतील पायाभूत सुविधा, गुणवत्ता, सर्व योजनांचे तपशील, कागदपत्रांची तपासणी अशा सत्तर निकषांची पाहणी करावी लागणार आहे. त्यासाठी एका शाळेसाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत एका अधिकार्‍याला दिवसाला दोन किंवा तीन शाळांची तपासणी करावी लागणार आहे, असे विभागातील एका अधिकार्‍यांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
पतंजलीनं कोरोनाच्या औषधावर घेतला यू-टर्न
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ, सर्वसामान्य
जगभरात १४ कोटी २६ लाख तर गेल्या ५० वर्षांत भारतात ४ कोटी ५
तामिळनाडूत ‘तब्लीग’चे १२९ सदस्य डिटेन्शन कॅम्पमध्ये, स
दिल्ली हिंसाचार: जखमींवर उपचार करणार्‍या डॉक्टरचंही चा
एनआरसी, एनपीआर व सीएएच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितील
वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या जाळल्या प्रती
‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प
सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकारची वाटचाल, शरद पवा
श्रमिक ट्रेनमध्ये मृत झालेल्या मजुरांचा आकडा केवळ शंभर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper