×

बाबा तुझा आयुर्वेदावर भरोसा नाय कायं?

Published On :    13 Nov 2019
साझा करें:

सध्या आयुर्वेदिक उत्पादनांचा जास्तीचा उहापोह करून अनेक बुवा बाबा यांनी स्वत: कडे करोडो रूपयांची माया जमवली मात्र हेच बुवा बाबा स्वत:च्या व्याधींवर स्वत: तयार केलेली आयुर्वेदीक उत्पादने वापरत नाहीत तेव्हा हसू येते.



आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचार पध्दती आहे असे म्हटले जाते. अनेक वनस्पतींत औषधी गुण असतात यात शंका नाही पण काही व्याधींवर आयुर्वेदीक औषधोपचार ऍलोपॅथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतो असे म्हणतात. परंतु सध्या आयुर्वेदिक उत्पादनांचा जास्तीचा उहापोह करून अनेक बुवा बाबा यांनी स्वत: कडे करोडो रूपयांची माया जमवली मात्र हेच बुवा बाबा स्वत:च्या व्याधींवर स्वत: तयार केलेली आयुर्वेदीक उत्पादने वापरत नाहीत तेव्हा हसू येते.


प्रसारमाध्यामाच्या बातमीनुसार शुक्रवारी दुपारी पतंजलीचे चेअरमन आचार्य बाळकृष्ण हे पतंजली योगपीठ येथे त्यांच्या कार्यालयांमध्ये काम करत असताना अचानक त्यांना छातीत कळा येण्यास सुरूवात झाली आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर तात्काळ त्यांना हरिद्वार येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपस्थित डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना ‘एम्स’ मध्ये दाखल होण्याच्या सुचना मिळाल्या. मग बाळकृष्ण यांना ‘एम्स’ मधील आपत्कालीन विभागात भरती करण्यात आले. 


‘एम्स’ मध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्ट व ब्लड प्रेशर, ईजीशी नॉर्मल आहेत असे सांगण्यात आले. जे पतंजलीचे चेअरमन बाळकृष्ण रोज सकाळी पसारमाध्यमातून लोकांना पतंजलीची औषधे व त्यांची उपचारपद्धती यावर भाष्य करताना दिसतात. मग प्रश्न पडतो की, हृदयअमृतवटी एक्स्ट्रा पावर हे पतंजलीचे औषध न घेता एम्समध्ये उपचारासाठी दाखल झालेले पतंजलीचे चेअरमन आणि योगगुरु रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आजपर्यंत लोकांना पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पानांविषयी वेड्यात काढत होते का?  


बाळकृष्ण यांच्या छातीत दुखत असल्यास ते स्वत: अलोपॅथीक  उपचार घेण्यासाठी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल होतात अन् लोकांना हृदयअमृतवटी एक्स्ट्रा पावर हे पतंजलीचे औषध घेण्यासाठी रोज सकाळी भाषण देतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. हृदयविकारावर उपचार म्हणून पतंजली तर्फे एक औषधे बाजारामध्ये विकली जाते. ती औषधी ‘हृदयअमृतवटी एक्स्ट्रा पावर’ हे आहे याची किंमत (११० रुपयाला ६० गोळ्या) असून बाळकृष्ण यांनी स्वत:च्या कंपनीचे औषध घेतले नाही का? ते ‘अद्भुत’ औषध घेऊन प्राण वाचणार नाहीत, याची मनोमन खात्री बाळकृष्ण यांना वाटत असल्यानेच त्यांनी एम्समध्ये उपचार घेण्याचा योग्य निर्णय घेतला असावा हे मात्र नक्की.


आचार्य बाळकृष्ण यांना झालेला आजार आणि घेण्यात आलेली उपचार पद्धती यावर सोशल मीडीयाच्या माध्यमातून अनेक तर्क वितर्क लावून प्रश्न विचारले जात आहेत आणि ते बरोबरही आहे, पतंजलीतर्फे प्रत्येक रोगावर औषधी असल्याचा दावा केला जातो तर मग पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांना स्वत: च्या उपचारासाठी ‘एम्स’ मध्ये का दाखल व्हावे लागले? पतंजली कंपनीकडून आयुर्वेदीक औषधांच्या साहाय्याने  बाळकृष्ण यांच्यावर उपचार होत नव्हते का? तसेच ‘रॉफ्ल अथेइस्ट नावाच्या व्यक्तीने ट्विट करून म्हटले आहे की, ‘पतंजलीला आपली उत्पादने जास्तीत जास्त विक्री करण्याची ही एक चांगली संधी होती, बाळकृष्ण यांनी जर स्वत: पतंजलीच्या उत्पादनांचा वापर केला असता तर लोकांना पण विश्वास आला असता मात्र आता लोकांचा पतंजली वरचा विश्वास उडणार हे मात्र नक्की. तसेच त्याने रामदेव व बाळकृष्ण यांना ‘टॅक्स चोर, चंदन तष्कर, भु माफिया व पाखंडी’ असेही ट्विट करून म्हटले आहे.


रामदेव हे बाळकृष्ण यांच्या आजाराबाबत बोलत असतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये बाबा रामदेव म्हणतात की, ‘बाळकृष्ण यांची तब्येत पेढा खाल्याने बिघडली आहे’ त्यापुढे ते म्हणतात की, कृष्ण जन्माष्टमी दिवशी एक व्यक्ती पेढे घेऊन आला होता त्याने दिलेला पेढा बाळकृष्ण यांनी खाल्ला होता. त्या व्यक्तीने दिलेल्या पेढ्यात असणार्‍या विषामुळे लगेच दहा पंधरा मिनिटांनंतर बाळकृष्ण बेशुद्ध झाले’. त्यानंतर तात्काळ बाळकृष्ण यांना ‘एम्स’ दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण आता बाळकृष्ण यांची तब्येत सामान्य असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे तसेच तुम्हा सर्वांनी केलेली प्रार्थना आणि देवाचा आशीर्वाद यांच्यामुळे बाळकृष्ण यांच्या तब्येत व्यवस्थित आहे असे रामदेव बाबा म्हणतात. मग लोकांनी केलेली प्रार्थना अन् देवाचा आशीर्वाद यांच्यावर बाळकृष्णची तब्येत व्यवस्थित होत असेल तर रामदेव बाबांनी बाळकृष्ण यांना ‘एम्स’ दाखल का केले ?


यापुर्वीही रामदेव यांनी स्वत:च्या गुढगादुखीसाठी खुद्द बाबांनी विदेशात जाऊन उपचार घेतले होते मग ‘बाबांचाही पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवर भरोसा नाय कायं ?’ असे म्हणावे वाटते. जगातील सर्व आजारांवर आयुर्वेदिक उपचार करता येतात व त्यातून आजार बरा होतो असा दावा करताना आजही काही महाशय दिसतात पण ऐतिहासिक वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास ते निष्फळ आहे असे म्हणावे का?


कॉलरा, प्लेग, देवी, मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मुलनासाठी आयुर्वेद काहीही करू शकला नाही. आधुनिक संशोधनानंतर या रोगांचे निर्मुलन झाले पण रामदेव बाबा आणि बाळकृष्ण सारखे लोक प्रासारमाध्यमांच्या सहाय्याने बहूजनांतील अंधश्रद्धाळू लोकांवर जाहिरातींचा तुफान मारा करत देशभक्ती व स्वदेशीचा काढा पाजून जिवघेणी औषधं विकतात अन् त्यातून कमावलेला गडगंज पैसा ते स्वत:च्या उपचारासाठी खर्च करताना ‘एम्स’ मध्ये किंवा विदेशातील दवाखान्यांमध्ये दिसतात. मग रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण व त्यांची कंपनी पतंजलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल का करू नये? 


संपूर्ण भारत देशाला आयुर्वेदाच्या नावाखाली चूर्ण खाऊ घालणार्‍या पतंजलीने सरकारला हाताशी धरून देशातील हजारो एकरचा ‘भूखंड केवळ श्रीखंड’ म्हणून हडप केला आहे. पण आत्तातरी तो भूखंड सरकारने परत घेऊन त्यांचा देशहितासाठी किंवा लोकोपयोगासाठी वापरावा असे वाटते. बहुजनांनो आयुर्वेदिक उत्पादनांपासून आणि त्यांची विक्री करणा-या बुवा बाबांपासून दूर रहा अन्यथा ‘हम लोग बनेंगे येडा और बाबा खायेंगे पेढा’ असे होईल म्हणून या फसव्या बुवा, बाबापासून सावध रहा अन्यथा तुमची फसवणूक होईल हे मात्र निश्‍चित.

नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper