×

२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्रकाशित

Published On :    13 Nov 2019
साझा करें:

दर महिन्याला ९४८ तर दररोज ३१ आत्महत्या



नवी दिल्ली : २०१६ मध्ये महाराष्ट्रातील आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ३ हजार ६६१ इतकी होती, जी देशात सर्वाधिक होती. २०१६ मध्ये एकूण ११ हजार ३७९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये गृहमंत्रालयाने दिली आहे. या आकड्याचा अर्थ दर महिन्याला ९४८ आत्महत्या किंवा दररोज ३१ आत्महत्या असा होतो.


२०१६ मध्ये ११ हजार ३७० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सरकारने जुलै २०१८ मध्ये लोकसभेमध्ये सांगितले होते मात्र हा डेटा तात्पुरता असून एनसीआरबीने अजून अंतिम अहवाल दिले नसल्याचेही स्पष्ट केले होते.


अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांबद्दलचा हा अंतिम अहवाल आता प्रकाशित करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. २०१४ मधील १२ हजार ३६० आणि २०१५ मधील १२ हजार ६०२ पेक्षा आत्महत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. २०१६ साठी एनसीआरबीने शेतकर्‍यांच्या आत्महत्येची कारणे काय याबद्दलची माहिती प्रकाशित केलेली नाही. यामध्ये बहुतांश पुरुष शेतकरी असून महिलांची संख्या फक्त ८.६ टक्के इतकीच आहे. याचे एक कारण म्हणजे शेतावर काम करणार्‍या बहुसंख्य महिलांना शेतकरी म्हणून ओळख नसते.


३ हजार ६६१ आत्महत्यांसह महाराष्ट्रातील आत्महत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ही संख्या ४ हजार ४ आणि २०१५ मध्ये ४ हजार २९१ होती. महाराष्ट्रात २०१३ ते २०१८ या काळात एकूण १५ हजार ३५६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका आरटीआय अर्जावरील उत्तरात मिळाली आहे. कर्नाटक दुसर्‍या क्रमांकावर असून २०१६ मध्ये तिथे २ हजार ७९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, २०१५ मध्ये ती संख्या १ हजार ५६९ होती.


तेलंगणामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. २०१४-१५ मध्ये १ हजार ३४७ आणि १ हजार ४०० असलेली ही संख्या २०१६ मध्ये ६४५ झाल्याचे एनसीआरबीच्या डेटावरून दिसते. पश्‍चिम बंगाल राज्याने २०१५ व १६ मध्ये हा डेटा पुरवला नाही. २०१४ मध्ये तिथे २३० आत्महत्या नोंदवल्या गेल्या. 


मात्र २०१५ आणि २०१६ मध्ये एकही आत्महत्या नोंदवली गेली नाही. बिहार राज्यानेही २०१६ या वर्षात एकही आत्महत्या नोंदवली नाही. मात्र बिहार आणि पश्‍चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी शेतकरी आत्महत्या होत असल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत. २०१६ चा डेटा पकडून, १९९५ पासून भारतात ३ लाख ३३ हजार ४०७ आत्महत्या झाल्या आहेत. १९९५ पासूनच एनसीआरबीने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा डेटा प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper