×

कर्नाटकातील सतरा आमदार अपात्रच, पण पोटनिवडणूक लढवता येणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Published On :    13 Nov 2019
साझा करें:

कर्नाटक विधानसभा सभापतींनी १७ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच आहे. मात्र, या आमदारांना पोटनिवडणूक लढविता येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला.



नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा सभापतींनी १७ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच आहे. मात्र, या आमदारांना पोटनिवडणूक लढविता येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला.


विधानसभा सभापती के. आर. रमेश कुमार यांनी कॉंग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळल्यानंतर १७ आमदारांना अपात्र ठरविले होते. हा निर्णय योग्य असून तो आम्ही कायम ठेवत असल्याचा निर्णय न्यायाधीश एन. व्ही. रामणा, संजीव खन्ना आणि कृष्णा मुरारी यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला आहे. अपात्र ठरविण्यात आलेले आमदार येत्या ५ डिसेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक लढवू शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.


विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी कॉंग्रेसच्या १४ व निजदच्या ३ आमदारांना व्हीपचे उल्लंघन करून पक्षांतरविरोधी कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले होते. या अपात्रतेच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदारांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. 


सतरा आमदार अपात्र ठरवण्यात आले असून त्यांना निवडणूक लढवता येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. संसदीय व्यवस्थेत नैतिकता महत्त्वाची असते सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी नैतिकतेचे पालन करावे, असा सल्ला कोर्टाने दिला.


या प्रकरणात कोणत्याही कारणास्तव आमदारांच्या वर्तणुकीला प्रोत्साहन देता येत नाही. त्यामुळे विधानसभा सभापतींनी दिलेला निर्णय उचलून धरण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. आमदारांना अपात्र ठरवल्याने संबंधित मतदारसंघातील जागा रिक्त होणार आहेत. त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेता येणार आहे. 


ही पोटनिवडणूक अपात्र आमदार लढवू शकतील. सदर उमेदवार निवडून आले तरी त्यांना मंत्रिपद देऊ नये, अशी सूचना कोर्टाने केली आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सभापतींना आहे.पण, त्याची मुदत ते ठरवू शकत नाहीत. आमदारांनी स्वेच्छेने राजीनामा दिला तर तो सभापतींनी स्वीकारावयास हवा, असे आदेशात म्हटले आहे.


कर्नाटकातील आघाडी सरकारने विश्‍वासदर्शक ठरावावेळी बहुमत गमावले. त्यास १७ आमदार कारणीभूत ठरले. बहुमत सिद्ध करावयाच्या वेळी कॉंग्रेस आणि निजदने व्हीप जारी केले, तरी संबंधित आमदार अनुपस्थित राहिले. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून तत्कालीन अध्यक्ष रमेशकुमार यांनी त्यांना अपात्र ठरवले. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper