×

स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटींचा चुराडा!, ब्रिस्क कंपनीला कंत्राट

Published On :    14 Nov 2019
साझा करें:

एसटीचा ५०० कोटींचा संचित तोटा तब्बल पाच हजार कोटी रुपयांवर पोचला असताना स्वच्छतेच्या नावावर तब्बल साडेचारशे कोटींचा चुराडा एसटी महामंडळाकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



मुंबई : एसटीचा ५०० कोटींचा संचित तोटा तब्बल पाच हजार कोटी रुपयांवर पोचला असताना स्वच्छतेच्या नावावर तब्बल साडेचारशे कोटींचा चुराडा एसटी महामंडळाकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत कार्यालयातील स्वच्छतेसाठी एसटीने ‘ब्रिस्क’नामक कंपनीला कंत्राट दिले आहे. कंपनीकडून फक्त ‘कागदोपत्री’ स्वच्छता होत असतानाही या कंपनीला वर्षाला सुमारे १२५ कोटी रुपयांचे बिल राजकीय दबावापोटी दिले जात असल्याचा आरोप एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.


एसटीची सर्व स्थानके, बस, आगार परिसरासह एसटीच्या कार्यालयांतील दैनंदिन स्वच्छतेसाठी महामंडळाने ‘ब्रिस्क’ला ४४६ कोटी ९९ लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. दोन वर्षांपासून कंपनी राज्यात काम करत आहे. एसटीची स्थानके, आगार आणि गाड्या, कार्यालय स्वच्छ करण्याचे या कंपनीचे काम आहे. त्यासाठी कंपनीला पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्र, साहित्य वापरायचे आहे; मात्र कंपनीजवळ अपुर्‍या सुविधांमुळे एसटीची स्वच्छताच होत नसल्याचे दिसून येत आहे.


महामंडळाने ऑक्टोबर २०१७ मध्ये हे कंत्राट दिले होते. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला होता; मात्र त्यानंतरही राज्यातील स्थानके, आगार, कार्यालय आणि गाड्या अस्वच्छ आहेत. 


अनेक आगारांमध्ये गाड्या एसटीच्या कर्मचार्‍यांना धुवाव्या लागत आहेत. त्यामुळे अस्वच्छ गाड्या रस्त्यांवर धावताना दिसून येत असल्याने, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एसटी कार्यालयातील स्वच्छताच होत नसेल, तर कोट्यवधी रुपये खर्च करून एसटी महामंडळ आणखी तोट्यात घालण्यासाठी करण्यात येत आहे का, असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करत आहेत. यासंदर्भात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


प्रकल्पासाठी दिलेले कंत्राट २०२० पर्यंत राहणार आहे. यामध्ये स्वच्छतेच्या विविध कामांसाठी दर ठरवण्यात आले आहे. त्यामध्येही वर्षाला दहा टक्के वाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे एसटी महामंडळ वर्षाला १३ कोटी रुपयांची वाढ कंपनीला करून देत आहे.



‘एसटी महामंडळाकडून वेळेत बिल मिळाले तर कर्मचार्‍यांना वेळेत पगार देता येतो. अन्यथा कामगार काम सोडून जातात. सर्वच आगारांमध्ये स्वच्छता आहे. गाड्याही रोज धुण्यात येतात. कंत्राटामधील उल्लेखाच्या तुलनेत प्रत्यक्षात साफसफाई करण्यासाठी कमी परिसर आणि कमी गाड्या धुण्यासाठी मिळत असल्याने कंपनीला कमी उत्पन्न मिळत आहे.’
- विनोद राणे, महाव्यवस्थापक, ब्रिस्क कंपनी

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper