×

अमेरिकेत मुस्लिम, ज्यू आणि शीख हेट क्राईमचे सर्वाधिक बळी

Published On :    14 Nov 2019
साझा करें:

फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा अहवाल



वॉशिंग्टन : अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था अर्थात फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) २०१८ मध्ये ‘हेट क्राइम’ म्हणजेच द्वेष अपराध प्रकरणांचा अहवाल तयार करून त्याचा डेटा प्रसिद्ध केला. त्यानुसार, मागील वर्षी अमेरिकेत वैयक्तिक तिरस्काराच्या गुन्ह्यांची टक्केवारी १६ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. 


एफबीआयच्या मते, एका वर्षात लॅटिन वंशाच्या लोकांविरुद्ध सर्वाधिक हेट क्राईम घडले. त्याचवेळी मुस्लिम, ज्यू आणि शीख देखील मोठ्या संख्येने हेट क्राइमचे बळी ठरले. शिखांविरूद्ध हेट क्राईमच्या प्रकरणांमध्ये २०१७ ते २०१८ दरम्यान ३ पटींनी वाढ झाली आहे.


एफबीआयच्या वार्षिक अहवालानुसार २०१७ मध्ये शीख नागरिकांविरोधात २० हेट क्राईमच्या घटना घडल्या. परंतु, २०१८ मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या ६० वर पोहोचली. अमेरिकेत सर्वाधिक हेट क्राईमच्या घटना ज्यू धर्मीय नागरिकांविरोधात घडल्या. हेट क्राईमची ही टक्केवारी ५६.९ इतकी आहे. तर, १४.६ टक्के घटना या मुस्लिम नागरिकांविरोधात घडलेल्या आहेत. त्यानंतर हेट क्राईमच्या ४.३ टक्के घटना या शीख धर्मीय नागरिकांविरोधात घडल्या आहेत.


लॅटिन वंशाच्या लोकांविरुद्ध सर्वाधिक हेट क्राईम घडले आहेत. त्यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये ४३० तर, २०१८ मध्ये हेट क्राईमच्या ४८५ घटना घडल्या. दरम्यान, मुस्लिम आणि अरब नागरिकांविरुद्ध हेट क्राईमच्या २७० घटना घडल्या.


२०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये हेट क्राईमच्या घटनांमध्ये किरकोळ घट झाली असून ही आकडेवारी ७१७५ वरून ७१२० पर्यंत कमी झाली आहे. यापूर्वी, २०१६ ते २०१७ दरम्यान हेट क्राईममध्ये जवळपास १७ टक्क्यांनी वाढ झाली होती. या वेळी मालमत्तेविरूद्धची गुन्हेगारी कमी होत असताना, लोकांवर वैयक्तिक हल्ल्यांचे प्रमाण वाढले. हेट क्राईमच्या एकूण ७१२० घटनांपैकी ४५२१ (६१ टक्के) घटना या वैयक्तिक हेट क्राईमच्या घटना आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper