×

इंधन दरवाढीचा भडका! सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले

Published On :    18 Nov 2019
साझा करें:

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले आहे. पेट्रोल दरात वाढ झाली आहे.



नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले आहे. पेट्रोल दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल १६ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ७९.७१ रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ६९ रुपये आहे.


दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर १६ पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे ७४.०५ रुपये आणि ६५.७९ रुपये मोजावे लागतील.


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत पेट्रोल ११ पैशांना महागलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ७९.५५ रुपये मोजावे लागले. मात्र डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ६९ रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोल १२ पैशांनी महागलं होतं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी ७३.८९ रुपये मोजावे लागतील  तर डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६५.७९ रुपयांवर आला आहे.


देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आदेशाने तेल कंपन्यांनी सुरू केलेली कार्डावरील इंधन खरेदीवरील कॅशबॅक सवलत बंद केली आहे. नोटाबंदीनंतर २०१७ च्या सुरुवातीस ही सवलत सुरू करण्यात आली होती. 


काही दिवसांपूर्वी ‘एसबीआय कार्ड्स’ने आपल्या ग्राहकांना असा निर्णय घेतल्याबाबतचा एक संदेश पाठविला होता. त्यामध्ये कार्ड पेमेंट करून भरण्यात येणार्‍या इंधनावर देण्यात येत असलेली ०.७५ टक्के कॅशबॅकची सवलत १ ऑक्टोबर २०१९ पासून काढून घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बँकांना कळविले होते. इतर कार्ड पुरवठादार कंपन्याही यासंबंधीची घोषणा लवकरच करतील, असे सांगण्यात आले होते. ही सवलत तेल वितरक कंपन्यांकडून दिली जात होती. परंतु ग्राहकांना मिळणार्‍या कॅशबॅकचे क्रियान्वयन मात्र कार्ड पुरवठादार कंपन्या करीत होत्या.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
भारतात ५ वर्षात सुमारे ९४ लाख ९८ हजार झाडांची कत्तल
नजीकच्या काळात आर्थिक स्थिती बिकट होणार
एअर इंडियातील १०० टक्के भागीदारी विकणार
व्हॅटसंदर्भातली प्रकरणं निकाली काढा, लोकलेखा समितीची श
आधार खात्याशी लिंक नसल्याने ७३ हजार शेतकरी अडचणीत
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घोटाळा
भारतीय स्टेट बँकेने एनपीएमध्ये ११ हजार ९३२ कोटी रुपये लप
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper