×

संस्कृतच्या मुस्लीम प्राध्यापकाविरोधात ब्राम्हण विद्यार्थ्यांनी दाखवले रंग

Published On :    19 Nov 2019
साझा करें:

प्रा. फिरोज खान यांना विरोध झाल्याने भूमिगत, विद्यार्थी आरएसएस, एबीव्हीपीचे होते सदस्य



उत्तर प्रदेश : बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत स्कूलच्या धार्मिक विज्ञान संस्थानात ११ दिवसांपूर्वी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेल्या फिरोज खान या संस्कृत विषयाच्या मुस्लीम प्राध्यापकाविरोधात ब्राम्हण विद्यार्थ्यांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. प्रा. खान यांना विरोध करण्याचा सिलसिला विद्यार्थ्यांनी कायम राखला असल्याने अखेर त्यांना भूमिगत व्हावे लागले आहे. दरम्यान विरोधी करणारे विद्यार्थी हे आरएसएस व एबीव्हीपीचे सदस्य होते ही बाब समोर आहे.


प्रा. खान यांनी संस्कृतमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. सोमवारी प्रा.खान यांच्या नियुक्तीचा २० विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर निषेध व्यक्त केला. एवढ्यावरच ते विद्यार्थी थांबले नसून त्यांनी ‘हवन कुंड’ देखील बांधले आहे.


आपल्या विरोधातील निषेधांमुळे प्रा. खान निराश झाले आहेत. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना प्रा. खान म्हणाले की, ‘मी आयुष्यभर संस्कृतचा अभ्यास केला पण मी मुस्लीम आहे असे मला कधीच वाटले नाही. आता मला शिकवायचे आहे परंतु अचानक माझ्या नियुक्तीचा मुद्दा बनवण्यात आला आहे.  प्रा. खान हे पदवीधर, बीएड आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले प्राध्यापक आहेत. जयपूरच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत संस्थेतून त्यांनी २०१८ मध्ये पीएचडीही पूर्ण केली आहे. याशिवाय त्यांनी नेट आणि जेआरएफची पात्रताही पात्र केली आहे.


प्रा. खान म्हणाले, ‘मी दुसरीत वर्गात असल्यापासून संस्कृत शिकण्यास सुरूवात केली, पण कोणीही आक्षेप घेतला नाही. अगदी जयपूरपासून ३० किमी दूर असलेल्या बागरू परिसरात ३० टक्के मुस्लिम आहेत, तेथील स्थानिक मौलवीनीदेखील मला संस्कृत शिकण्यास मनाई केली नाही. मला संस्कृत साहित्याबद्दल जेवढे माहित आहे तितके कुराण बद्दलही नाही. माझ्या भागात राहणार्‍या काही हिंदू लोकांनी मुस्लीम असूनही माझ्या संस्कृत ज्ञानाचे कौतुक केले आहे. प्रा. खान यांचे वडील रमझान हेसुद्धा संस्कृतमध्ये पदवीधर आहेत.


दुसरीकडे इतर तीन विद्यार्थ्यांसह विरोधाचे नेतृत्व करणारे कृष्णा कुमार म्हणाले, जर एखादी व्यक्ती आपल्या भावना किंवा संस्कृतीशी जोडलेली नसेल तर आम्ही आमचा धर्म कसा समजून घेऊ? विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये शशिकांत मिश्रा, शुभम तिवारी आणि चक्रपाणी ओझा यांचा समावेश आहे. या निषेधामागे कोणतीही राजकीय संघटना नसल्याचे मिश्रा या विद्यार्थ्याने सांगितले.  तथापि, आपण आरएसएस सदस्य होतो. तर ओझा एबीव्हीपी आणि तिवारी एबीव्हीपी व केंद्रीय ब्राम्हण महासभेचे सदस्य होते असे मिश्राने स्पष्ट केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
पतंजलीनं कोरोनाच्या औषधावर घेतला यू-टर्न
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ, सर्वसामान्य
जगभरात १४ कोटी २६ लाख तर गेल्या ५० वर्षांत भारतात ४ कोटी ५
तामिळनाडूत ‘तब्लीग’चे १२९ सदस्य डिटेन्शन कॅम्पमध्ये, स
दिल्ली हिंसाचार: जखमींवर उपचार करणार्‍या डॉक्टरचंही चा
एनआरसी, एनपीआर व सीएएच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितील
वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या जाळल्या प्रती
‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प
सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकारची वाटचाल, शरद पवा
श्रमिक ट्रेनमध्ये मृत झालेल्या मजुरांचा आकडा केवळ शंभर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper