×

भाजपा सरकारने घाईघाईत निवडणूक बॉंड प्रणाली लादली

Published On :    19 Nov 2019
साझा करें:

आरबीआयच्या आक्षेपांकडे कानाडोळा, आरटीआयमध्ये उघड



नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकार घेतलेल्या आपल्याच धोरणांमुळे त्रस्त झाले आहे. भाजपा सरकारने घाईघाईत निवडणूक बॉंड प्रणाली लादल्याचे आरटीआयमध्ये उघड झाले आहे. निवडणूक बॉंड प्रणालीच्या माध्यमातून काळा पैसा वापरण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली होती. या आरबीआयच्या आक्षेपांकडेही कानाडोळा करण्यात आला होता. भाजपाकडे काळा पैसा पोहचण्यासाठीच घाईघाईत निवडणूक बॉंड आणण्यात आला अशा आशयाचे ट्विट करत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपावर हल्ला चढवला.


‘हफिंग्टन पोस्ट’ या इंग्रजी वृत्तपत्राने कागदपत्रे समोर आणली असून आरबीआयने नकार दिल्यानंतरही भाजपा सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडणूक बॉंड प्रणालीला मान्यता दिली. १ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या भाषणात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘इलेक्टोरल बॉंड’ ची अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच केले. याअंतर्गत राजकीय पक्षांना निनावी आणि गोपनीय देणग्या घेण्यास परवानगी होती. परंतु यातला सर्वात मोठा अडथळा आरबीआयच्या मंजुरीचा होता.


या संदर्भात, २८ जानेवारी, २०१७ रोजी, एका अर्थ मंत्रालयामधील अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना एक पत्रही लिहले आहे. या पत्रात निनावी आणि गोपनीय देणगी कायदेशीर करण्यासाठी आरबीआय कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दुरुस्तीशी संबंधित आराखडा तयार करून तो आपल्या वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविला. यानंतर अर्थ मंत्रालयाने पाच ओळींचा ई-मेल आरबीआयला पाठवत प्रस्तावित दुरुस्तीबाबत मत मागवण्यात आले.


आरबीआयने आपल्या उत्तरात निवडणूक बॉंड आणि आरबीआय कायद्यातील दुरुस्ती ही वाईट प्रवृत्तीला खतपाणी  घालण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे मनी लॉंड्रिंग आणि भारतीय चलनावर अविश्‍वास वाढीस लागेल. अशा प्रकारचे पाऊल केंद्रीय बँकिंग कायद्याच्या मूलभूत तत्त्वांचा नाश करेल. दरम्यान, आरबीआयनेही निवडणूक बॉंड प्रभावीपणे बियरर बॉंड होईल. यामध्ये पारदर्शकता आणि गोपनीय पैशांच्या स्त्रोत समजणार नाही असा इशारा देण्यात आला होता. निवडणूक बॉंडद्वारे जारी केलेल्या चलनाची किंमत कमी होऊ शकते अशी भीतीही आरबीआयने व्यक्त केली होती.


दरम्यान, आरबीआयने इशारा देऊनही भाजपा सरकारने आधीच निवडणूक बॉंड योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आरबीआयचे हे आक्षेप फेटाळून लावले होते. अधिया यांनी तत्कालीन आर्थिक व्यवहार सचिव आणि अर्थमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, आरबीआयचा या सल्ल्ल्याला उशिर झाला असून वित्त विधेयक अगोदरच छापण्यात आले आहे. म्हणून आम्ही आमच्या प्रस्तावावर पुढे जाणार आहोत.  त्यानंतर ही फाईल जलदगतीने पुढे सरकत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तत्काळ त्यावर स्वाक्षरी केली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
भारतात ५ वर्षात सुमारे ९४ लाख ९८ हजार झाडांची कत्तल
नजीकच्या काळात आर्थिक स्थिती बिकट होणार
एअर इंडियातील १०० टक्के भागीदारी विकणार
व्हॅटसंदर्भातली प्रकरणं निकाली काढा, लोकलेखा समितीची श
आधार खात्याशी लिंक नसल्याने ७३ हजार शेतकरी अडचणीत
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घोटाळा
भारतीय स्टेट बँकेने एनपीएमध्ये ११ हजार ९३२ कोटी रुपये लप
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper