×

महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु

Published On :    14 Dec 2019
साझा करें:

माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केंद्राच्या अर्थनीतीची केली पोलखोल



नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु असून अर्थव्यवस्था आयसीयूत जात असल्याची चिंता देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सरकारला दुहेरी ताळेबंदाच्या समस्येपासून सावध करतानाच यामुळे मोठी किंमत चुकवावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.


हार्वर्ड विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विभागातील एका अहवालात सुब्रमण्यम यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणतात, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेला ट्वीन (दुहेरी) बॅलन्स शीटच्या (टीबीएस) दुहेरी लाटेचा सामना करावा करावा लागत आहे. ही स्थिती महामंदीच्या स्वरुपात परिवर्तीत होत आहे. 



सुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतातील आर्थिक मंदी ही सामान्य मंदी नाही. ही महामंदी आहे. यामुळे अर्थव्यवस्थेची गंभीर्याने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांनी टीबीएस संकटाबाबत सरकारला सुचित करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार खासगी कार्पोरेट्स कंपन्यांकडून एनपीएच्या रुपातील वाढत्या कर्जाशी जोडलेला आहे.


सध्या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये प्राध्यापक असलेले सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतातील कार्यालयाचे माजी प्रमुख जोश फेलमॅन यांच्यासह सहलेखक म्हणून लिहिलेल्या लेखामध्ये आपल्या मूळ टीबीएस आणि टीबीएस-२ यामधील फरक विशद केला आहे. त्यांनी म्हटले की, टीबीएस-१ हा सन २००४ ते २०११ या काळातील बँकेच्या कर्जांबाबत आहे. 


यावेळी गुंतवणूक उच्च पातळीवर सुरु होती. या काळात बँकांनी स्टील, वीज आणि पायाभूत सुविधा निर्माण करणार्‍या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली होती. तर, टीबीएस-२ नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या आर्थिक घडामोडींवर आधारित आहे. यामध्ये बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.


या अहवालात त्यांनी म्हटले की, नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम बँकांमध्ये जमा झाली. यातील मोठा हिस्सा एनबीएफसी कंपन्यांना देण्यात आला. त्यानंतर एनबीएफसी कंपन्यांनी हा पैसा रिअर इस्टेट क्षेत्रात गुंतवला. २०१७-१८ पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्राच्या ५ लाख कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता थकीत कर्जाच्या अर्ध्या हिस्स्याइतकी आहे. 


यासाठी एनबीएफसी कंपन्या जबाबदार होत्या. सुब्रमण्यम यांच्या मतानुसार, सप्टेंबर २०१८ मध्ये आयएल अँण्ड एफएस कंपनी बुडणे ही भूंकपाप्रमाणे घटना होती. ही घटना केवळ ९० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकीमुळे नव्हे तर पायाभूत सुविधांसाठी कर्ज देण्यामुळे तसेच बाजारांना जागृत करणे आणि संपूर्ण एनबीएफसी क्षेत्राला अश्‍वस्त करण्यासाठी देखील प्रेरित करीत होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
‘आज तक’ची बदमाशी सुरूच
भाजपा कार्यकाळात भारतात वाढला भ्रष्टाचार
मुलींनी बुरखा घातला तर महाविद्यालयात प्रवेश नाही
भाजप खासदाराने धार्मिक भावना भडकावल्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper