×

‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्या वंशजांचा आक्षेप

Published On :    14 Dec 2019
साझा करें:

आगामी ‘तान्हाजी’ या चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे १४ वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.



पुणे : आगामी ‘तान्हाजी’ या चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे १४ वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.


तान्हाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तान्हाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. 


पण आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली. तसेच या चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अथवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास द्यावी अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचाही आक्षेप -

बहुचर्चित चित्रपट ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शकांना चित्रपटात लवकरात लवकर बदल करण्यास सांगितले आहेत. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा. अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.’ एवढच नाहीतर ट्विटमध्ये आव्हाडांनी पुढे म्हटलं आहे की, ‘याला धमकी समजली तरी चालेल’.

काय आहे तान्हाजी चित्रपट?

स्वराज्य निर्मितीसाठी कामी आलेला एक मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकली आहेत. यात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अजिंक्य देवदेखील भूमिका साकरतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं आहे. हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेला हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
‘आज तक’ची बदमाशी सुरूच
भाजपा कार्यकाळात भारतात वाढला भ्रष्टाचार
मुलींनी बुरखा घातला तर महाविद्यालयात प्रवेश नाही
भाजप खासदाराने धार्मिक भावना भडकावल्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper