×

स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी

Published On :    14 Dec 2019
साझा करें:

पर्यटनाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी घशात घालण्याचे षड्यंत्र-जिग्नेश मेवाणी यांचे निलंबन



नवी दिल्ली: गुजरात विधानसभेतील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना सभागृहाच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. वडगाम मतदारसंघाचे प्रतिनिधी असलेल्या मेवाणी यांनी १० डिसेंबर रोजी विधानसभेच्या बाहेर स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्राचा विकास करण्यासंबंधीच्या विधेयकाची प्रत जाळली होती. ते विधेयक आदिवासीविरोधी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.


राज्यातील भाजप सरकारला विरोध करताना ते म्हणाले, हे विधेयक म्हणजे पर्यटनासाठी या क्षेत्राचा विकास करण्याच्या नावाखाली पुतळ्याच्या जवळची आदिवासींची जमीन घशात घालण्याचे साधन आहे. मेवाणी म्हणाले, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपास राहणार्‍या आदिवासींच्या विरोधाला न जुमानता केवडिया येथे त्याची उभारणी करण्यात आली. आता तिथल्या आणखी ७० गावांची जमीन ताब्यात घेऊन तिथल्या लोकांना तिथून हुसकावण्याचा सरकारचा बेत आहे.


मी राज्य विधानसभेतील आदिवासी आणि अनु.जातीच्या समाजाच्या ४० आमदारांना एकत्र येण्याचे आणि या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले. मेवाणी यांनी अध्यक्षांचे म्हणणे ऐकून न घेता, ते सर्व राज्यघटनेला नव्हे तर मनुस्मृतीला मानणारे लोक आहेत असे सभागृहाला सांगितल्यामुळे, बेशिस्त आणि अध्यक्षांचा अनादर या कारणांकरिता त्यांना निलंबित करण्यात आले. हे विधेयक ११ डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आले. कॉंग्रेसचे आमदार यावेळी बाहेर निघून गेले. हे विधेयक आदिवासी विरोधी असल्याचा कॉंग्रेसचाही दावा आहे. सभागृहाचे सत्रही त्याच दिवशी समाप्त झाले.


राज्याच्या नर्मदा जिल्ह्यात असणार्‍या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. १८२ मीटर उंचीचा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगात सर्वात उंच असल्याचे म्हटले जाते. 


राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, उद्घाटनापासून २९ लाखपेक्षा जास्त पर्यटकांनी पुतळ्याला भेट दिली आणि त्यातून ८२.५१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे आकडे प्रस्तुत करून राज्याचे वनमंत्री गणपत वसावा म्हणाले, या क्षेत्राचा विकास करण्याची तातडीची आवश्यकता असल्यामुळे हे विधेयक आणण्यात आले आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी जवळजवळ ३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
स्वजातीच्या हितासाठीच ब्राम्हण जगत असल्याचा पुन्हा एकद
चंद्रशेखर आझाद यांना हैदराबाद पोलिसांनी घेतले ताब्यात
२०२० चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बिकट अवस्था
भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्याची गरज
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper