×

मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या

Published On :    15 May 2018
साझा करें:

राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना कॉंग्रेसचे साकडे



नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करून राजकीय आणि व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी विरोधीपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची वक्तव्ये जाहीरपणे करीत आहेत, अशी तक्रार करत मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना घातले आहे.


कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी प्रधानमंत्रीपदाला न शोभणारी भाषा वापरल्याचे राष्ट्राध्यक्षांना पाठविलेले पत्र कॉंग्रेसने प्रसिद्ध केले. कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व आत्तापर्यंत त्याने अनेक आव्हाने व धमक्या पचविल्या आहेत. 


अशा धमक्यांना कॉंग्रेसचे नेतृत्व नेहमीच धीराने व निर्भयतेने सामोरे गेले आहे. त्यामुळे मोदींच्या धमक्यांपुढेही कॉंग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते जराही नमणार नाही, असे या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.


मोदींनी पातळी सोडली तरी प्रधानमंत्रीपदाला कमीपणा येईल, अशी त्यांच्याविषयी वक्तव्ये आम्ही कधीच करणार नाही, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार सांगत आले आहेत. कर्नाटकच्या प्रचारात मोदींनी विधिनिषेध सोडल्याने प्रचार संपताच कॉंग्रेसने त्यांच्याविषयीचे गार्‍हाणे राष्ट्राध्यक्षांकडे मांडले आहे. 


भाजपाने लगेच पलटवार करून मर्यादा सोडून बेलगाम वक्तव्ये करणे ही कॉंग्रेसची संस्कृतीच असल्याचा आरोप करत सन २००९ पासून कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी केलेल्या विधानांची जंत्रीच जाहीर केली. 


त्यात कॉंग्रेस नेत्यांनी मोदींना गंदी नाले का कीडा, गंगू तेली, पागल कुत्ता, भस्मासूर, रावण, बंदर व उंदीर म्हटल्याचा उल्लेख आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ व ‘जहर की केती करनेवाला’ म्हटल्याचेही भाजपाने स्मरण दिले. 


भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हणाले की, ज्यांनी शालीन भाषेची मर्यादा सोडण्याचा विक्रम केला आहे तेच मोदींवर बोट उगारत आहेत. पण दुसर्‍याकडे बोट दाखविताना चार बोटे स्वत:कडे असतात याचे त्यांनी भान ठेवावे. 


कर्नाटकमधील पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेस तोंड लपविण्यासाठी काही तरी निमित्त शोधत आहे. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे, माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, कर्णसिंग, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी व मुकुल वासनिक इत्यादी कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले गेले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१२ हजार ७०० कोटींचा घोटाळा करणारा नीरव मोदी लंडनमध्ये
येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराच
राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी
अडीच दिवसांचा गणपती
फेक न्यूजचे समूळ उच्चाटन गरजेचे
२८ मे रोजी होणार मराठा आरक्षण सुनावणी
..... तर बुलडोझरखाली चिरडेन!
कर्नाटकचे हे पाच नेते ठरणार ‘गेमचेंजर’
तांत्रिक कामांमुळे मुंबईची विमानसेवा अधांतरी
मी विष्णूचा अवतार, कामावर येणार नाही
मान्सूनची वर्दी, केरळात २९ रोजी बरसणार
अमेरिकेतल्या शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात
ब्राह्मणतंत्र राष्ट्रीय संकट तर शिकलेल्या लोकांना माहि
माधुरी गुप्ता करत होत्या आयएसआयसाठी हेरगिरी
भारतीय पारपत्र विकून मिळू शकते टॅक्स हेवन देशांचे नागरि
तंबाखूविरोधी मोहीम राबविणार्‍या तृतीयपंथीयांचा होणार
कॉंग्रेस -जेडीएसला धक्का
क्युबामध्ये प्रवासी विमान कोसळले
मुंबईतील डबेवाले ग्राहकांना देणार कुरियर, पार्सलसेवा
गुजरातमध्ये सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटला, १९
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper