×

शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार

Published On :    15 Dec 2019
साझा करें:

नागपुरात उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन



नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला तोंड देईल. अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीचा, कर्जमाफीचा मुद्दा तर गाजेलच, शिवाय आरेतील मेट्रो कारशेड तसेच इतर प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या भूमिकेवरही सरकारला बोलते केले जाणार आहे.


हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असले तरी सहा कॅबिनेट मंत्र्यांवर भिस्त ठेवून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला अधिवेशनाला सामोरे जावे लागणार आहे. पहिल्याच अधिवेशनात सरकारला घेरण्याऐवजी काही दिवस काम करू देण्याचे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आधीच जाहीर केले आहे. 


मात्र, शेतकरी मदत, कर्जमाफीचा मुद्दा आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने त्यांना देण्यात येणारी स्थगिती हे मुद्दे विरोधकांकडून रेटले जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने या दोन्ही नेत्यांकडून अधिवेशनावर पुरेपूर छाप पाडण्याचा प्रयत्न होईल.


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या आरेतील कारशेडला स्थगिती दिली. याशिवाय कारशेडसाठी पर्यायी जागा तसेच आरेतील वृक्ष कत्तलीच्या चौकशीसाठी सरकारने समिती नेमली. या निर्णयावर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून टीकेची झोड उठवली जाणार असल्याचे कळते. 


नगरविकास आणि ग्रामविकास विभागाच्या निधीतील कामांनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली असून यावरही विरोधी पक्ष आवाज उठविण्याची शक्यता आहे. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी शिवसेनेने शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने आधीच्याच निकषाच्या आधारे शेतकर्‍यांना मदत जाहीर केली. त्यामुळे विरोधी पक्षाकडून २५ हजाराच्या मदतीचा मुद्दा उचलून धरला जाऊ शकतो. 


अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ठाकरे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने विरोधी पक्ष चहापानाचे निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता आहे.

प्रश्‍नोत्तरे नाहीत
या अधिवेशनात तारांकित प्रश्‍नोत्तराचा तास होणार नाही. प्रश्नोत्तरे नसलेले हे बहुधा पहिलेच अधिवेशन असावे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, लक्षवेधी सूचनांसह शासकीय विधेयके तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चेला येईल. तसेच दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. उद्या, सोमवारपासून सुरू होणार्‍या या अधिवेशनाचे सूप २१ डिसेंबरला वाजेल.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
स्वजातीच्या हितासाठीच ब्राम्हण जगत असल्याचा पुन्हा एकद
चंद्रशेखर आझाद यांना हैदराबाद पोलिसांनी घेतले ताब्यात
२०२० चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बिकट अवस्था
भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्याची गरज
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper