×

भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धारण

Published On :    15 Dec 2019
साझा करें:

केंद्रात १८ टक्के जागा रिक्त, ५ लाख पोलिसांच्याही रिक्त जागा



नवी दिल्ली :  भाजपा खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धारण बसली असून खासदारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांना नाकीनऊ आले आहेत. दरम्यान देशात बेरोगारी वाढत असून केंद्रात १८ टक्के जागा रिक्त आहेत. ५ लाख पोलिसांच्याही जागा रिक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


शंकर अय्यर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात विचारलेल्या एकूण १४ हजार प्रश्नांवर आणि त्यांना प्राप्त झालेल्या आकडेवारीवर एक अहवाल लिहिला आहे. त्यांच्या मते, भाजप खासदार शारदाबेन पटेल यांनी केंद्र सरकारमधील रिक्त जागेवरील प्रश्‍न सरकारला विचारला होता. त्याला उत्तर देण्यात आले ते धक्कादायक होते. केंद्रातील एकूण ३८.०२ लाख पदांपैकी सुमारे ६.८३ लाख पदे रिक्त आहेत. म्हणजेच एकूण पदांपैकी १८ टक्के पदे रिक्त आहेत, तर देशातील तरुण रोजगारासाठी भटकत आहेत.


राज्यसभेत भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) शास्त्रज्ञांची किती पदे रिक्त आहेत? त्याला उत्तर देताना सरकारने सांगितले की, ६,५४६ कृषी वैज्ञानिक पदांपैकी १,४५३ पदे रिक्त आहेत. म्हणजेच, प्रत्येक पाच पदांमागे एक पद रिक्त आहे.


केंद्राशिवाय राज्यातील सरकारांचा दृष्टीकोनही नकारात्मक आहे. लोकसभेतील रायचूरचे खासदार राजा ए नाईक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मानव संसाधन विकास मंत्री म्हणाले की, शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या एकूण ९.१४ लाख पदांपैकी २.१३ लाख पदे रिक्त आहेत. तसेच पोलिसांच्या २३ लाख मंजूर पदांपैकी पाच लाख पदे रिक्त आहेत. आरोग्य क्षेत्रातही डॉक्टरांची मोठी कमतरता आहे, परंतु सरकार त्या जागा भरत नाही. आकडेवारीनुसार ग्रामीण प्रथमोपचार केंद्रांतील मंजूर २५,७४३ पैकी ८५७२ पदे रिक्त आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
स्वजातीच्या हितासाठीच ब्राम्हण जगत असल्याचा पुन्हा एकद
चंद्रशेखर आझाद यांना हैदराबाद पोलिसांनी घेतले ताब्यात
२०२० चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बिकट अवस्था
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
‘आज तक’ची बदमाशी सुरूच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper