×

माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळचेपी

Published On :    15 Dec 2019
साझा करें:

हिंसाचाराला प्रवृत्त करणार्‍या बातम्यांचे प्रसारण न करण्याची सूचना



नवी दिल्ली : हिंसाचाराला प्रवृत्त करणार्‍या बातम्यांचे प्रसारण अथवा प्रकाशित करू नयेत अशी आदेशवजा सूचना खासगी चॅनेल्सना माहिती व प्रसारण मंत्रालयाने केली होती. अशा प्रकारचा सल्ला देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार सुरू असून हा सल्ला मागे घेण्यात यावा अशी मागणी एडिटर्स गिल्डने केली आहे.


एडिटर्स गिल्ड म्हणाले की, देशात घडणार्‍या घटनांच्या जबाबदार कव्हरेजबाबत माध्यमांच्या एकूण बांधिलकीवर अशा सल्लामसलत करता कामा नये. या आठवड्याच्या सुरुवातीस मंत्रालयाने सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांना हिंसा करण्यास प्रवृत्त करणार्‍या, ‘देशविरोधी वृत्तीला चालना देणारी’ सामग्री प्रसारित करताना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितले. त्यामुळे देशाच्या अखंडतेवर परिणाम होऊ शकतो. स्वतंत्रपणे व निःपक्षपातीपणे अहवाल देणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. माध्यमांच्या स्वतंत्र कामात अडथळा आणणार्‍या अशाप्रकारच्या सल्ल्याचा निषेध करत असल्याचे एडीटर्स गिल्डने म्हटले आहे.


यापूर्वीही माहिती व प्रसारण मंत्रालय अनेकवेळा खासगी टीव्ही वाहिन्यांसाठी सल्ला दिला होता. प्रसारण संहितेनुसार नमूद केलेल्या सामग्रीचे प्रसारण काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली जात आहे. सरकारच्या या अलीकडील मार्गदर्शक तत्त्वांना विरोधकांनी विरोध दर्शविला. राज्यसभेत तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मंत्रालयाच्या या निर्देशांविरूद्ध नोटीस दिली.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण
देशाच्या महसुली तुटीत होणार वाढ
सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय
२९ जानेवारीला ५०० जिल्ह्यात भारत बंदची तयारी
सीएए विरोधाचे लोण युरोपियन संसदेतही
सीएए, एनआरसीसारखे कायदे आणून भारताचे पुन्हा तुकडे करण्य
यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्
हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी मोदींचे काश्मीरवर निर्बंध
कोरेगाव भीमा दंगल: सत्य बाहेर येऊ नये यासाठी एनआयएकडे तप
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीस उपअधिक
मोदी-शहा यांच्या मर्जीनुसार नव्हे तर संविधानानुसार देश
बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घे
२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन
राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड
नरेंद्र मोदी भारताला नेत आहेत कडवट हिंदुत्वाकडे
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फ्लॉप पिक्चर
‘आज तक’ची बदमाशी सुरूच
भाजपा कार्यकाळात भारतात वाढला भ्रष्टाचार
मुलींनी बुरखा घातला तर महाविद्यालयात प्रवेश नाही
भाजप खासदाराने धार्मिक भावना भडकावल्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper