×

अमेरिकेत शिखांची स्वतंत्र जनगणना, मग भारतात ओबीसींची का नाही?

Published On :    16 Jan 2020
साझा करें:

ओबीसी जातीसमूहांचा शासक वर्गाला खडा सवाल



वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रथमच शिखांची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून जनगणना होणार आहे. यंदा (२०२० साली) अमेरिकेत होणार्‍या जनगणनेवेळी शीख धर्मीयांची स्वतंत्ररीत्या गणना करण्यात येणार असल्याची माहिती, येथील अल्पसंख्याक संघटनेने दिली. अमेरिकेत शिखांची स्वतंत्र जनगणना होत असताना भारतात ओबीसींची स्वतंत्र जनगणना का केली जात नाही? असा खडा सवाल ओबीसी जातीसमूहांकडून शासक वर्गाला विचारला जात आहे.


सॅन डियागो येथील शीख संघटनेचे अध्यक्ष बलजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाची स्वतंत्ररीत्या जनगणना व्हावी यासाठी आम्ही बर्‍याच वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांसमवेत अनेकदा बैठका घेण्यात आल्या. त्याचे फळ आज मिळाले आहे. या निर्णयाचा केवळ शीख धर्मीयांनाच नव्हे, तर अमेरिकेतील सर्व अल्पसंख्याक समुदायांना पुढच्या काळात फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समुदायाची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून गणना होत असून, त्यांना विशिष्ट प्रकारचा संकेतांक (कोड) दिला जाणार आहे. या संकेतांकामुळे स्वतंत्ररीत्या गणना करताना अधिक पारदर्शकता आणि अचूकता राहील, अशी माहिती अमेरिकेतील जनगणना कार्यालयाचे उप-संचालक रॉन जर्मिन यांनी दिली. शीख संघटनांच्या दाव्यानुसार, आजमितीस अमेरिकेतील शिखांची संख्या दहा लाख असून, जनगणनेनंतर त्यात निश्‍चितच वाढ झालेली दिसून येईल.


अमेरिकेत शिखांच्या स्वतंत्र जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. गेली अनेक वर्षे ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून लोकांनी आंदोलने केली. शासक वर्गाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु भारतातील शासक वर्ग नेहमीच ओबीसींच्या तोंडाला पाने पुसताना दिसत आहे. ज्यावेळी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे येतो त्यावेळी शासक वर्गाकडून नवीनच मुद्दा उपस्थित करून या विषयाला बगल दिली जाते. १९३१ नंतर ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना झालेलीच नाही. त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.


दरम्यान, ऑगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचे सुतोवाच केले. परंतु सत्तेत पुन्हा एकदा आल्यानंतर राजनाथ सिंह यांच्या तोंडातून ओसीबींच्या स्वतंत्र जनगणनेचा मुद्दा बासनात गुंडाळण्यात आला. विद्यमान गृहमंत्री अमित शहा या विषयावर काहीच बोलत नाहीत. ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना होऊ नये यासाठी एनआरसी, सीएए यासारखे स्फोटक विषय समोर आणण्यात आल्याची शंका आहे. कारण २०२१ मध्ये भारताची जनगणना होणार आहे. जनगणना आयुक्त कार्यालयाकडून तसा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. परंतु ओबीसींची स्वतंत्र जनगणना न करता त्यांना हिंदू या कॉलमखाली टाकून ब्राम्हणांचे अकाऊंट फुगवले जाते. स्वतंत्र जनगणना होत नसल्याने ओबीसीला हक्क व अधिकार मिळत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात काहीच मिळत नाही. हाती केवळ त्यांच्या धत्तुरा असतो.


अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने अमेरिकेत राहणार्‍या शिख समुदायाची स्वतंत्र जनगणना करण्याचे संकेत देऊन त्यांना हक्क व अधिकारापासून वंचित ठेवणार नाही हे दाखवून दिले आहे. त्यामुळे अमेरिकेतील शिख समुदायाची मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे. परंतु भारतात मात्र शासक वर्ग असलेल्या ब्राम्हणांकडून ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला फाटा देऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली तर आकडेवारी कळेल. एवढेच नव्हे तर ज्या ओबीसींच्या जागांवर ब्राम्हणांनी डल्ला मारला आहे त्या खाली कराव्या लागतील. आपल्या वाट्याचे कोण खात आहे हे ओबीसीच्या लक्षात येईल. परिणामी ओबीसी ब्राम्हणाला जाब विचारेल याची भीती असल्याने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला ब्राम्हण जीवतोड विरोध करताना दिसून येतो अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसत आहेत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper