×

घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता २० टक्के वीज दरवाढीचा ‘शॉक’

Published On :    16 Jan 2020
साझा करें:

ग्राहक आले मेटाकुटीला, १ एप्रिलपासून प्रस्तावित वीज दरवाढ



मुंबई: नव्या वर्षात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता महावितरणही वीजदरवाढीचा झटका देणार आहे. महावितरणने २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे (चएठउ) सादर केला आहे. वार्षिक तोटा भरुन काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वीज दरवाढ मंजूर झाल्यास ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक दरवाढीचा प्रस्ताव घरगुती आणि व्यापारी ग्राहकांसाठी ग्राहकांच्या हरकतींवर सुनावणी होऊन १ एप्रिल २०२० पासून प्रस्तावित वीज दरवाढ लागू होणार आहे.


मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणार्‍या महावितरणने ५९२७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी ५५ लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणार्‍या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यापार्‍यांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.


दरम्यान, डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्क्यांवर गेला. यात भाजीपाल्याच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्के वाढल्या असून खाद्यपदार्थांच्या किमतीत १४.२२ टक्के वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ एप्रिल २०२० पासूनच्या या वीज दरवाढीमुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडणार आहे. पाच वर्षांच्या काळात वीज ग्राहकांकडून ६० हजार ३१३ कोटी रुपये वसूल करण्याचा महावितरणचा उद्देश आहे.


राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर पद्धतीनुसार इतर वीजवितरण कंपन्यांसह महावितरणनेही आता २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळासाठी ५.८० टक्के, २०२१-२२ मध्ये ३.२५ टक्के, २०२२-२३ मध्ये २.९३ टक्के, २०२३-२४ मध्ये २.६१ टक्के तर २०२४-२५ मध्ये २.५४ वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व महसुली मुख्यालयांच्या शहरांत महावितरणच्या प्रस्तावावर सुनावणी होईल. त्यात ग्राहक संघटनांना व इतरांना हरकती घेता येतील.


सध्या किती मिळतो महसूल..

सध्याच्या वीजदरातून महावितरणला ७६ हजार ९९८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. नवीन वीजदर लागू झाल्यानंतर ८२ हजार ९२५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ ५९२७ कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी ५.८० टक्के असेल. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोग प्रत्यक्षात किती दरवाढ मंजूर करतो याकडे लक्ष असणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘सीएए’ला विरोध करणार्‍यांवर सरकारने गोळीबार करावा
हिंमत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा नि
भाजपा सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा
माझा घटनेवर पूर्ण विश्‍वास पण कोर्टावर नाही
भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
केंद्राने जीएसटीचे १५ हजार कोटी थकविल्याने राज्यापुढे
मंदीचा सामना करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार फटक
तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफ
अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर
ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौर्‍यावर १०० कोटी
सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत
दिल्ली पोलिसांचा जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका
....मग सात दिवसांचा पगार का?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper