×

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून १ हजार २०० कोटींचा चुराडा

Published On :    16 Jan 2020
साझा करें:

निवडणूक आयोगाला दिलेल्या खर्चाच्या ताळेबंदातून बाब समोर



नवी दिल्ली: मागील वर्षी झालेल्या लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारावर भाजपने तब्बल १ हजार २०० कोटी रुपयांचा चुराडा केला असल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या खर्चाच्या ताळेबंदातून ही बाब समोर आली आहे.


मागील वर्षी एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुकांसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान भाजपने हा खर्च केला आहे. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा २०१९ च्या निवडणुकीवर भाजप तब्बल ७७ टक्के अधिक खर्च केला आहे. त्या निवडणुकांवर भाजपने ७१४ कोटी रुपये खर्च केले होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चानुसार भाजपने प्रचारासाठी १०७८ कोटी रुपये खर्च केले. तर, १८६.५ कोटी रुपये पक्षाच्या उमेदवारांवर खर्च करण्यात आले. यामध्ये माध्यामातील प्रचारासाठी ६.३३ लाख रुपये देण्यात आले असल्याचे म्हटले. प्रचार साहित्यावर ४६ लाख रुपये, प्रचार सभा, मिरवणुकांवर ९.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, २.५२ कोटी रुपये अन्य खर्च करण्यात आले.


कॉंग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ८२० कोटी रुपये खर्च केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर ५१६ कोटी रुपये खर्च केले होते. लोकसभा निवडणुकांसह आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांसाठी भाजपच्या केंद्रीय कमिटीने ७५५ कोटी रुपये खर्च केले. यामध्ये स्टार प्रचारकांसाठी १७५.६८ कोटी खर्च करण्यात आले. माध्यमातील जाहिरातींसाठी ३२५ कोटी खर्च करण्यात आले. यामध्ये मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम, बल्क मेसेज, वेबसाईट्स, टीव्ही वाहिन्या आदींचा समावेश आहे. तर, पोस्टर्स, कटआउट्स आणि बॅनरसाठी २५. ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले. जाहीर सभांसाठी १५.९१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर, २१२. ७२ कोटी रुपये ‘अन्य’ बाबींवर खर्च करण्यात आले आहेत. भाजपच्या केंद्रीय समितीने राज्य समितींना ६५१ कोटी रुपये निवडणुकांसाठी दिले होते.
भाजपने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये २४१० कोटी रुपयांचा पक्षनिधी मिळाले असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या ताळेबंदात म्हटले होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत १३४ टक्क्यांनी वाढ झाली होती.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper