×

जेएनयू हिंसाचार, चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती

Published On :    16 Jan 2020
साझा करें:

कोमल शर्मा नाव असल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण



नवी दिल्ली: ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार व विद्यार्थ्यांसह काही प्राध्यापकांना मारहाण करणार्‍या गुंडांच्या जमावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती कोमल शर्मा असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. जेएनयूत तोंडावर रुमाल व कापड बांधून अनेक गुंड घुसले होते, त्यात एक महिलाही व्हिडिओमध्ये आढळली होती.


कोमल शर्मा ही दिल्लीतील दौलत राम कॉलेजची विद्यार्थीनी असून ती आरएसएसप्रणित अभाविप संघटनेसाठी काम करते. जेएनयूतल्या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यापैकी एका व्हिडिओत साबरमती हॉस्टेलमध्ये कोमल शर्मा काही गुंडांसमवेत विद्यार्थींनीना दम देताना दिसून आली होती.  कोमलने आपली ओळख लपवण्यासाठी चेहर्‍यावर फिकट निळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता व तिच्या हातात एक काठी होती. तिच्यासोबत दोन पुरुषही होते. या सर्वांनी आपले चेहरे कापडाने बांधले होते व त्यांच्या हातात काठ्या होत्या.


पोलिसांनी कोमल शर्माची ओळख पटल्यानंतर तिला आणि अक्षत अवस्थी व रोहीत शहा अशा अन्य दोघांना आयपीसी १६० कलमअंतर्गत एक नोटीस पाठवली आहे. पण या तिघांचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना कळालेला नाही. त्यांचे मोबाइल फोनही बंद असून ‘इंडिया टुडे’ने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये अवस्थी व शहा या दोघांनी जेएनयूच्या हिंसाचारात आपण सहभागी होतो अशी कबुली दिल्याचे आढळून आले होते. दरम्यान अभाविपचे दिल्ली शाखेचे सरचिटणीस सिद्धार्थ यादव यांनीही कोमल शर्मा आमच्या संघटनेची सदस्य असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. आमचा कोणाचाही कोमलशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.


जेएनयूतल्या दोन विद्यार्थ्यांची चौकशी

मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुचेता तालुकदार व प्रिया रंजन या दोन विद्यार्थ्यांनीची सुमारे दोन तास चौकशी केली. सुचेता तालुकदार ही ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशच्या ‘जेएनयूएसयू’ची कौन्सिलर आहे. तर प्रिया रंजन जेएनयूच्या भाषा, साहित्य व संस्कृती विभागात बीए शिकत आहे. सुचेताने सुमारे दीड पानाचे एक पत्र एसआयटीकडे दिले तर प्रिया रंजनने एक पानी आपले म्हणणे पोलिसांना दिले आहे. ५ जानेवारी रोजी आपण नेमके कुठे होतो याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रियेतून स्त्री स
आरक्षणासाठी आता धनगर समाजाचा एल्गार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या कार्यालयाल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper