×

भारतात ३५.४ टक्के महिला अद्यापही निरक्षर

Published On :    17 Jan 2020
साझा करें:

दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या भारतातील महिलांची स्थिती अहवालातून बाब समोर



पुणे : एकविसाव्या शतकात महिलांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी भारतासारख्या प्रगत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ६४.६ टक्के असून, ३५.४ टक्के महिला अद्यापही निरक्षर आहेत. आपण शंभरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. साक्षर महिलांपैकी ४६.०५ टक्के महिला बारावीपेक्षा कमी शिकलेल्या आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणार्‍या महिलांची संख्या वाढली असली तरी दहावी ते बारावीच्या शिक्षणातील मुलींची टक्केवारी कमी झाली आहे. केवळ ५०.६८ टक्के महिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर ४९.३२ टक्के महिलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. विवाह आणि आर्थिक समस्या ही शिक्षण थांबविण्याची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.


‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे ‘भारतातील महिलांची स्थिती’ या विषयावर करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी अध्ययन अहवालातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या तीन विषयांवर अभ्यासामध्ये लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. यामध्ये १८  वर्षे आणि त्यापुढील वयाच्या महिलांचा विचार करण्यात आला. देशातील उत्तर, दक्षिण, पश्‍चिम, पूर्व आणि ईशान्य हे पाच विभाग, २९ राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेशातील ४६४ जिल्ह्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त महिला कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून शास्त्रीय पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एकूण ७४ हजार ९५ महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. त्यातील ७ हजार ६७५ मुली या १८ वर्षांखालील आहेत. या अभ्यासात सहभागी झालेल्या महिला स्वयंसेवकांसाठी ५२१ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. मनीषा कोठेकर यांनी दिली.


‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या अभियानांमुळे मुलींची पावले शाळांकडे वळली असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असले तरी अद्यापही मुलींच्या शिक्षणाने शंभरी गाठलेली नाही. अजूनही महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ६४.६ टक्के इतकेच आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भटक्या जमातीतील २५ वर्षांपुढील वयाच्या महिलांमध्ये १०० टक्के महिला निरक्षर आहेत. आदिवासी महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण (४९.३५ टक्के) अनुसूचित जातीतील महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष अभ्यासातून समोर आले आहेत.


विवाह आणि आर्थिक समस्यांमुळे महिलांना शिक्षण थांबवण्याची वेळ

केवळ ५० टक्के महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, ४९.३२ टक्के महिलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. ३०.७६ टक्के महिलांनी माध्यमिक शाळेत असतानाच शिक्षण थांबविले. साधारणपणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर गळतीचे प्रमाण अधिक आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी माध्यमिक स्तरावर शिक्षण सोडले तर अनुसूचित जमातीतील बहुतेक महिलांनी प्राथमिक स्तरावरच शिक्षण थांबविले. विवाह, आर्थिक समस्या आणि घराजवळ शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसणे तसेच कौटुंबिक जबाबदार्‍या वाढल्याने शिक्षण घेता आलेले नाही. दरम्यान, खुल्या प्रवर्गातील महिलांनी पदवीचे शिक्षण घेतानाच आणि पदवीनंतर शिक्षण थांबवले.


‘भारताची लोकसंख्या १२१.०६ कोटी इतकी आहे. त्यातील ४८.५ टक्के महिलांचे प्रमाण आहे. याचा अर्थ अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. समाजाचा त्या महत्त्वपूर्ण घटक आहेत. सध्या त्यांची सामाजिक, शैक्षणिक स्थिती काय आहे? कोणत्या समस्या आहेत का? ही स्थिती अधिक चांगली करण्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला. या मुख्य अहवालाबरोबर राज्यनिहाय स्वतंत्र अहवालदेखील तयार केले जाणार असून, केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि महिला आयोगाला हे अहवाल सादर केले जातील. या अहवालातील निष्क र्षांनुसार सरकारला कोणत्या गोष्टींवर भर देण्याची गरज आहे हे समजू शकेल.’- डॉ. मनीषा कोठेकर, प्रकल्प संचालक

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper