×

डीएनए बेसड् एनआरसी ब्राम्हणवादाच्या अंताची सुरूवात

Published On :    17 Jan 2020
साझा करें:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित केंद्रातील भाजपा सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर असे जुलमी कायदे लादून लोकांची नागरिकता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एनआरसी हे मुस्लीमविरोधी भासवले जात असले तरी त्यामध्ये काहीच तथ्य नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित केंद्रातील भाजपा सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर असे जुलमी कायदे लादून लोकांची नागरिकता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एनआरसी हे मुस्लीमविरोधी भासवले जात असले तरी त्यामध्ये काहीच तथ्य नाही. तुम्ही नागरिकच नाही तर तुम्हांला कुठल्या आधारे मताचा अधिकार द्यायचा असेही सांगितले जाईल. म्हणजे या कायद्याच्या माध्यमातून मताचा अधिकारही काढून घेण्याचे मोठे षड्यंत्र आहे. विश्‍वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘Brahmins have a brain with in the brain ब्राम्हणाच्या एका मेंदूत अनेक षड्यंत्रकारी मेंदू असतात. याच षड्यंत्रकारी मेंदूतून एनआरसीसारखे घातक पाऊल उचलून त्यांचा ब्राम्हण राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मूलनिवासी बांधवांनो लवकरच सावध व्हायला हवे. केवळ सावध होऊन उपयोगाचे नसून लढा उभारला पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा गुलामीचे चटके सोसावे लागणार एवढे मात्र निश्‍चित आहे. लोकांना मताचा अधिकार मिळालाच नसता. चौथी पास, संस्थानिक व कर भरणार्‍यांनाच मताचा अधिकार असावा अशी मागणी त्यावेळी ब्राम्हणवाद्यांची होती. तर गोलमेज परिषदेत मोहनदास करमचंद गांधी यांनीही सर्वच लोकांना मताधिकार देऊ नये असे सांगितले होते. परंतु डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत गांधींचे म्हणणे खोडून काढले होते. या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक संस्थानिकही होते. त्यामध्ये बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाडही होते. आम्हांला शिकण्याचा अधिकार नव्हता, त्यामुळे आम्ही चौथी पासचे सर्टीफिकेट देऊ शकत नाही. आम्ही संस्थानिक नाही व आम्हांला कमाविण्याचाही अधिकार नाही, मग कर कुठून भरणार? त्यामुळे कराच्या पावत्या आमच्याकडे नाहीत. या तिन्ही बाबी पूर्ण करू शकत नाही. आमच्या भवितव्याचा फैसला संस्थानिक घेऊ शकत नाहीत. तो फैसला आम्हीच घेऊ शकतो. एक मात्र खरे की आमच्याकडे वय आहे. कारण जन्माला आलेला मनुष्य हा वयाने वाढतच जातो. तोच आम्ही तुम्हांला पुरावा देऊ शकतो. डॉ.आंबेडकरांच्या या म्हणण्याला श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी दुजोरा दिला व सांगितले की, डॉ.आंबेडकर म्हणतात ते बरोबर आहे. शेवटी डॉ.आंबेडकरांच्या तर्कसंगत मांडणीपुढे मोहनदास गांधी व इंग्रजांना माघार घ्यावी लागली आणि प्रौढ मताधिकार मिळाला. त्यानुसार डॉ. आंबेडकरांनी कलम क्र. ३२६ नुसार २१ वर्षे वयाच्या भारतातील प्रत्येक नागरिकास प्रौढमताचा अधिकार दिल्यामुळे तो बजावता येतो. ‘वन व्होट-वन व्हॅल्यू’ यानुसार गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला एकच मत देता येते. अमेरिकेतील निग्रो लोकांना मताचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यात अनेकांचे बळीही गेले. परंतु भारतातील लोकांना मताचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागला नाही. कारण डॉ.आंबेडकर यांच्या एकट्याच्या संघर्षाने हा अधिकार मिळाला. फुकट मिळालेल्या अधिकाराचे लोकांना मूल्य वाटत नाही. म्हणून कुणालाही लोक निवडून देत आहेत. मताचा अधिकार म्हणजे तुमच्या भवितव्याचा तो फैसला आहे. राजीव गांधींच्या कालखंडात वयाची मर्यादा १८ वर्षे करण्यात आली. खरे तर मताचा अधिकार हा राजा बनण्याचा अधिकार आहे. पूर्वी राजे-रजवाडे यांच्या कालखंडात राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, म्हणजेच तो पारंपरिक राजा होता. परंतु तो राजा काही काळ मतपेटीतून जन्माला आला आणि आता तो ईव्हीएममध्ये घोटाळा करून जन्म घेतो. आज एनआरसी, सीएए, एनपीआर यासारखे जुलमी कायदे केले गेले त्याचे मूळही ईव्हीएम मशीनच आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळा करून कॉंग्रेस व भाजपा हे ब्राम्हणवादी पक्ष आलटून-पालटून सत्तेवर येत आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या मतांची गरज नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदे केले बिघडले कुठे? अशी शासक वर्गाच्या षड्यंत्रकारी मेंदूत कुकल्पना येते. म्हणून बिनधास्तपणे तसे कायदे लागू करताना त्यांना भीती वाटत नाही.आसाममधील एनआरसीचा मुद्दा हा कॉंग्रेसच्या कालखंडातील आहे. कॉंग्रेसने त्याला खतपाणी घातले. त्याचा आता आगडोंब झाला आहे. एनआरसी हा एससी, एसटी, ओबीसींविरोधातील मुद्दा आहे. आसामधील १९ लाखांपैकी ५ लाख मुस्लीम सोडले तर १४ लाख एससी, एसटी, ओबीसी आहेत. उद्या देशभरात एनआरसी लागू करून लोकांकडून १९७१ च्या पूर्वीची कागदपत्रे मागवली जातील. ही कागदपत्रे असतीलच याची काही शाश्‍वती नाही. मग एससी, एसटी, ओबीसीला हिंदूच्या नावाखाली दुय्यम नागरिकत्व देऊन त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवले जाईल. हिंदूच्या नावाखाली दुय्यम नागरिकत्व मिळाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने मिळालेल्या मताचा अधिकारही काढून घेण्यात येईल. तुम्ही घुसखोर आहात, तुम्ही या देशाचे नागरिकच नाहीत असे सांगून केवळ सवर्णांना मताचा अधिकार ठेवून ब्राम्हण राष्ट्राचा मार्ग निर्धोक केला जाईल. संसदेची जागा धर्मसंसदेने घेतलेली असेल. म्हणजे येथील मूलनिवासींनाच विदेशी ठरवण्याचा ब्राम्हणांचा हा आटापिटा आहे.एनआरसी, सीएए, एनपीआर सारखे कायदे आणण्यामागेही मोठे कारण आहे. आज बामसेफने केलेल्या ४० वर्षाच्या प्रबोधनाने लोकांमध्ये जागृती वाढत चालली आहे. त्यांना मित्र कोण आणि शत्रू कोण याची ओळख होऊ लागली आहे. त्यातच डीएनएनुसार ब्राम्हण विदेशी असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक खुलेआमपणे ब्राम्हणवादाविरोधात बोलताना दिसत आहेत. आपली विदेशी ओळख लपवण्यासाठी नानातर्‍हेच्या युक्त्या व लबाड्या ब्राम्हणांना कराव्या लागत आहेत. रायटींग ऍन्ड स्पीचेसच्या पहिल्या खंडात पान ५२ वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘ब्राम्हणांचा काय हेतू राहतो? तो स्वजातीचे हित सांभाळण्याचा असतो. स्वजातीच्या हितासाठीच ब्राम्हण जगतात आणि मरतात. ब्राम्हणांच्या जीवनाचं उद्दीष्टच स्वजातीचं हित असत’. म्हणजेच ब्राम्हणांच्या हितासाठीच एनआरसी आणण्यात आले आहे. परंतु ब्राम्हणांची गाठ बामसेफशी आहे एवढे लक्षात ठेवा. तुम्ही हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हण राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले असले तरी मूलनिवासी राष्ट्र बनवण्यासाठी बामसेफने कंबर कसली आहे. कारण लढवय्येपणा हा मूलनिवासी नागवंशीय लोकांमध्येच आहे. नागवंशीय हा मार्शल आहे. पळपुटेपणा व भेकडपणा हा ब्राम्हणांच्या अंगी भिनला असल्याने मूलनिवासींच्या चक्रव्युहातून आता ब्राम्हणाला बाहेर पडता येणार नाही. येथील मूलनिवासींनाच विदेशी ठरवण्याचा खटाटोप ब्राम्हणांच्या अंगलट आला असून डीएनए बेसड् एनआरसी ब्राम्हणवादाच्या अंताची सुरूवात असेल यात शंका नाही.

दिलीप बाईत
९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper