×

चार महिन्यांपासून ४० हजार होमगार्ड्सचे थकले मानधन

Published On :    21 Jan 2020
साझा करें:

जवान आंदोलनाच्या पवित्र्यात, १४०.५५ कोटी रूपये सरकारकडून देणी



मुंबई: वाहतुकीचे नियमन करताना पाऊस-उन्हाची तमा न बाळगता पोलिसांच्या खाद्याला खांदा लावून काम करणारे, सणावारावेळी आणि निवडणुकांवेळी नियोजनाच्या कामात पोलिसांना मदत करणारे तसेच मोठ्या नैसर्गिक आपत्तीवेळी राबणार्‍या होमगार्डच्या जवानांवर स्वतःच घर चालवण्यासाठी उसने पैसे घेण्याची वेळ आली आहे. कारण, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना अद्याप मानधनच मिळालेले नाही. होमगार्डमधील अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली आहे.


जुलै २०१९ मध्ये होमागार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यामुळे सन २०१९ मध्ये मिळालेला निधी वाढीव मानधनानुसार ऑगस्ट २०१९ पर्यंत वापरण्यात आला. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून अद्यापपर्यंत होमगार्ड्सना मानधन मिळालेले नाही. याबाबत होमगार्डच्या कार्यालयाकडून अनेकदा सरकारला स्मरणपत्रे पाठवण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.


सरकारकडे आधीच होमगार्डला देण्याचा १३७.८३ कोटी रुपयांचा निधी थकला आहे. त्यानंतर आता आर्थिक वर्षांच्या शेवटी म्हणजेच मार्चच्या शेवटी सरकारला पुन्हा होमगार्डसाठी १४०.५५ कोटी रुपये देणे आहे. मात्र, सरकारने अद्याप पहिलाच निधी दिलेला नसल्याने पुढचा निधी कसा मिळेल याची भ्रांत होमगार्डच्या अधिकार्‍यांना पडली आहे. दरम्यान, जर सरकारने थकीत निधी तातडीने वितरीत केला नाहीतर होमगार्ड्सनाही आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असे होमगार्डच्या एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.


अधिकार्‍याच्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी राज्य सरकार होमागार्डच्या जवानांसाठी मानधन म्हणून १०० कोटी रुपयांची तरतूद करते. गेल्या वर्षीपासून होमगार्डच्या मानधनात प्रतिदिन ३०० ते ६७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मंजूर करण्यात आलेली रक्कम ऑगस्ट २०१९ पर्यंतच वापरली गेली. त्यानंतर अद्याप होमगार्ड्सचे जवान मानधनाच्या प्रतिक्षेतच आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper