×

मुस्लीमांसहित एससी, एसटी, ओबीसींच्या हाती २९ जानेवारीच्या भारत बंदची धुरा

Published On :    22 Jan 2020
साझा करें:

‘आज तक’सारख्या हिंदी चॅनेलची बदमाशी, चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न



पुणे: सीएए व एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने दि. २९ जानेवारी २०२० रोजी भारत बंदची हाक दिली आहे. कारण हा विषय राष्ट्रव्यापी आहे. या भारत बंदची धुरा मुस्लीमांसहित एससी, एसटी, ओबीसींच्या हाती आहे. त्यामुळे हा भारत बंद यशस्वी होईल असे संकेत मिळत आहेत. दरम्यान ‘आज तक’सारखे हिंदी चॅनेल व वेबसाईटने शाहीनबागमधील महिला आंदोलनकर्त्या व मुस्लीम २९ जानेवारीचा भारत बंद करत आहेत अशी चुकीची माहिती देऊन आंदोलनाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मीडियाच्या या बदमाशीने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.


कॉंग्रेस, भाजपा, कम्युनिस्टसहित देशातील ब्राम्हण-बनिया मीडिया सीएए व एनआरसी हा केवळ मुस्लीमांचा मुद्दा असे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तो मुद्दा मुस्लीमविरोधी नसून एससी, एसटी, ओबीसीविरोधी आहे. या संदर्भात बहुजन क्रांती मोर्चाने डिसेंबर महिन्यात तीन टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली. २० डिसेंबरला ५०० जिल्ह्यात धरणे आंदोलन, ८ जानेवारी जिल्हास्तरीय रॅली प्रदर्शन व २९ जानेवारीला भारत बंद अशी घोषणा केली आहे. १३ जानेवारीच्या शाहीन बागमध्ये महिला आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सीएए व एनआरसीविरोधात भारत बंद करण्यात येईल असे सांगितले. तोपर्यंत शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्‍या महिलांना २९ जानेवारीला भारत बंद होणार आहे याची माहिती नव्हती. 


असे असतानाही मीडियाने पुन्हा एकदा बदमाशी करत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. २९ जानेवारीचा भारत बंद मुस्लीमांनी व शाहीनबागमधील आंदोलनकर्त्या महिलांनी पुकारला असल्याचे ‘आज तक’सारख्या चॅनेलने सांगितले. लोकांना चुकीची माहिती देऊन भ्रमित करण्याचा प्रयत्न वारंवार मीडियाकडून केला जात आहे. यामागे धार्मिक धु्रवीकरण करून मुस्लीम विरूध्द एससी, एसटी, ओबीसीला हिंदू बनवून राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न आहे. मीडियाला हाताशी धरून अशाप्रकारे चुकीच्या बातम्या प्रसारित करून शासक वर्ग आपला हेतू साध्य करत आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होताना दिसत आहेत. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रधानमंत्री आवास योजनेचा फज्जा
भाजपा सरकारच्या काळात सरकारी बँकांच्या एनपीएमध्ये पाचप
राज्यातील ९१७ शाळा बंद होणार! निर्णयाविरोधात एसएफआय आक्
सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारांचे का रक्षण करत नाही ल
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा निवडणूक मोहिमेचा भाग
जाफराबाद बनलेय दिल्लीचा दुसरा शाहीनबाग
चिंताजनक, मुस्लीमविरोधी असूनही आरएसएस शाळांमध्ये ३० टक
डॉ. कफील खान यांच्या मामाची गोळ्या घालून हत्या
जमियत उलेमा संघटनेचा एनपीआर बहिष्कार आंदोलनास पाठिंबा
ट्रम्पना सोनाच्या ताट, गरीबांची खंगली उपासमारीने पाठ
मागण्या मान्य होईपर्यंत रस्ता खुला करणार नाही
२६ फेब्रुवारीला धनगर समाजाचं ‘सुंबराण’ आंदोलन
भाजपेतर राज्यांची ६० हजार कोटींची नुकसान भरपाई केंद्रा
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper