×

१३ जानेवारीचे शाहीनबागमधील वामन मेश्राम यांचे ‘आज तक’च्या डोळ्यात अंजन घालणारे भाषण

Published On :    22 Jan 2020
साझा करें:

एससी, एसटी,ओबीसी आंदोलनात नाहीत हीच कमतरता-वामन मेश्राम



नवी दिल्ली: सीएए व एनआरसीविरोधात शाहीनबागमध्ये आंदोलन करून मुस्लीम महिलांनी देशात वातावण बनवले आहे. या आंदोलनाने देशात चांगला संदेश गेला आहे. तुमच्याकडून लढण्याची प्रेरणा मिळाली असे प्रशंसोद्गार काढतानाच येथे केवळ मुस्लीम लढताना दिसत आहेत. परंतु ज्यांची खरी गरज आहे ते एससी, एसटी,ओबीसी लढताना दिसत नाहीत, हीच मोठी आंदोलनाची करतरता असल्याची खंत बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केली. 

आसाममध्ये १९ लाख लोकांना एनआरसीमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. म्हणजे १९ लाख लोकांना नागरिकता अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे. १९ लाख लोकांपैकी ५ लाख मुस्लीम सोडले तर १४ लाख एससी, एसटी, ओबीसीचे लोक आहेत. म्हणजेच मुस्लीमांपेक्षा तीनपट जास्त एससी, एसटी, ओबीसी आहेत. देशातील संघ व भाजपा परिवार, तमाम संस्था, संघटना, मीडिया हा केवळ मुस्लीमांचा मुद्दा आहे असे सांगत आहेत. परंतु ते साफ खोटे आहे. आपल्यासारख्या महिला जागृत झाल्या आनंदाची बाब आहे. महिलांनी याविरोधात मोर्चा खोलला अशाप्रकारची उदाहरणे कमी आहेत. परंतु यामध्ये दु:खाची बाब एवढीच आहे की, एससी एसटी, ओबीसी मैदानात नाही, ही मोठी गंभीर बाब आहे अशी खंत मेश्राम यांनी व्यक्त केली.


सीएए, एनआरसी, एनपीआरच्याविरोधात मुस्लीम लढत आहेत. आपल्यासारख्या महिला गेल्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त आंदोलन करत आहात. तरीही दिल्लीत बसलेल्या शासकाने त्याची दखल घेतली नाही. सरकारने गॅझेट प्रकाशित करून सीएए लागू केले आहे. याचा अर्थ तुमच्या आंदोलनाला सरकार मानत नाही. या आंदोलनाने प्रेरणा जरूर मिळाली परंतु त्यामध्ये कमतरता आहे. सीएए, एनआरसीविरोधात मुस्लीम जास्त लढत आहेत. एससी, एसटी, ओबीसी लढताना दिसत नाही. त्याने लढले पाहिजे असे मेश्राम यांनी सूचित केले.


मी २६ जून २०१९ पासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा करून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आहेत. ईव्हीएम चोर आहे तर निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहे. तर नरेंद्र मोदी महासरदार आहेत. यांच्या हौसला का वाढला आहे याची कारणमीमांसा सांगताना ईव्हीएममध्ये घोटाळा करून सरकार बनवले जाऊ शकते. त्यामुळे लोकांच्या मतांची आम्हांला गरज नाही असे त्यांना वाटते. सीएए व एनआरसीविरोधात एससी, एसटी, ओबीसी रस्त्यावर उतरला नाही तर आंदोलनाला सफलता मिळणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आम्ही २० डिसेंबरला ५०० जिल्ह्यात धरणे आंदोलन केले. ८ जानेवारीला देशभरात जिल्हा मुख्यालयात प्रदर्शन रॅली केली. त्यामध्ये १ हजार, २ हजार ते २.५ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. सीएए व एनआरसीविरोधात २९ जानेवारीला भारत बंद केला जाणार आहे. हा बंद एससी, एसटी, ओबीसींच्या माध्यमातून केला जाईल. केवळ मुस्लीम लढत आहेत. एससी, एसटी, ओबीसीने मैदानात यायला हवे. मुस्लीमांसहित एससी, एसटी, ओबीसीने भारत बंदचे नेतृत्व करायला हवे असे त्यांनी सांगितले.


शाहीनबाग म्हणजे भारत नाही. भारत फार मोठा देश आहे. याविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करावे लागणार आहे. त्यासाठीच ही तयारी सुरू आहे. येथील महिलांनी एक प्रेरणा दिली. त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. एससी, एसटी, ओबीसी व मायनॉरिटीने राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो असा विश्‍वास मेश्राम यांनी दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper