×

बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चा भाजपा सरकारने घेतला धसका

Published On :    25 Jan 2020
साझा करें:

आंदोलनापूर्वी सीएएमध्ये बदल करण्याचे दिले संकेत



नवी दिल्ली: बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली नागरिकता संशोधन कायदा (सीएए) आणि एनआरसीविरोधात दि. २९ जानेवारी २०२० रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदचा धसका भाजपा सरकारने घेतला असून आंंदोलनापूर्वी सीएएमध्ये बदल करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या ताकदीपुढे ब्राम्हणवादी सरकार टिकणार नसल्याचेच दिसून येत आहे.


केंद्रातील भाजपा सरकारने पहिल्यांदा तीन तलाक असंविधानिक घोषित करून ते समाप्त करण्यात आले. त्यानंतर काश्मीरमधील कलम ३७० हटवणे व अयोध्या मुद्यावर खोटे पुरावे सादर करून राम मंदिराचा निर्णय घेण्यात आला. आसाममध्ये एनआरसीमधून १४ लाख एससी, एसटी, ओबीसी आणि ५ लाख मुस्लीमांना बाहेर ठेवून त्यांना घुसखोर ठरवण्याचे षड्यंत्र आखले जात आहे.एससी, एसटी, ओबीसीला हिंदू बनवण्याचे षड्यंत्र केले जात आहे. म्हणजे धार्मिक धु्रवीकरण करून देशाचे पुन्हा एकदा विभाजन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. ईव्हीएम घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे जाणीवपूर्वक कायदे आणून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न आहे.


या सर्व बाबींचा विचार करता षड्यंत्राविरोधात वामन मेश्राम यांनी केंद्रातील भाजपा सरकारला चोहो बाजूंनी घेरले आहे. सरकारच्या निर्णयांमुळे त्रासलेली जनता रस्त्यावर आली आहे. सीएएविरोधात देशभरात होत असलेली आंदोलने थांबण्याची नाव घेत नाहीत. सारा देश शाहीन बाग बनलेला आहे. एनआरसी व सीएए नीती भाजपा सरकारसाठी घातक बनत चाललेली आहे. कारण वामन मेश्राम यांनी एनआरसी लागू करायची असेल तर डीएनए बेसड् असावी अशी घोषणा करत दि. २९ जानेवारी २०२० रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यामध्ये ३४ राजकीय पक्षांसहित एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या छोट्या-छोट्या हजारो संघटनांनी भारत बंदचे जोरदार समर्थन केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपा सरकारला धास्ती वाटू लागली आहे. देशातील सारी जनता सरकारविरोधात एकजूट झाली आहे. येणार्‍या काळात हीच जनता भाजपा सरकारला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. परिणामी बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदचा धसका घेऊन सीएए व एनआरसीबाबत बदल करण्याचे संकेत मिळत आहेत.


दरम्यान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सीएए मुस्लीमविरोधी नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आली. लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकार सीएएमध्ये बदल करू शकते. त्याचबरोेबर याबाबत लोकांकडून सूचना मागण्यात आल्या आहेत. यावरून भाजपा सरकार किती घाबरलेयं याचा हा पुरावा आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper