×

२९ जानेवारीच्या भारत बंदला हजारो संघटनांचे समर्थन

Published On :    25 Jan 2020
साझा करें:

बंद यशस्वी होण्याची खात्री



नवी दिल्ली:  नागरिकता संशोधन कायदा (सीएए) व रजिस्टर ऑफ सिटीझनशीप (एनआरसी) विरोधात सार्‍या देशभरात विरोध होत आहे. त्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाने उडी घेतली असून सीएए व एनआरसीविरोधात तसेच डीएनए बेसड् एनआरसी लागू करण्यासाठी दि. २९ जानेवारी २०२० रोजी भारत बंदची घोेषणा करण्यात आली आहे. एकट्या बिहार राज्यात कमीतकमी ५० राज्यस्तरीय सामाजिक तथा राजकीय संघटनांनी या भारत बंदला समर्थन दिले आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी होण्याची खात्री आहे.


गुरूवारी दि. २३ जानेवारी रोजी बिहारमध्ये ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस हजरत मौलाना वली रहमानी यांच्या नेतृत्वात जवळजवळ ३१ संघटनांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीला उपेंद्र कुशवाह, पप्पू यादव यांच्यासह काही संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला समर्थन देण्याचे सर्वांनी एकासुरात सांगितले. लोकांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.


सीएए व एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी डिसेंबर महिन्यात भारत बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनाचे दोन टप्पे झाले आहेत. आता तिसरा टप्पा भारत बंदचा आहे. दि. २९ जानेवारीच्या भारत बंदला समर्थन देणार्‍या हजारो संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, या बंदमध्ये आपल्या संघटनांचे अनेक कार्यकर्ते सहभागी होतील. या बंदमध्ये भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय अति मागास, अनु.जाती जागृती मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्‍चन मोर्चा, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, राष्ट्रीय घुमंतू जमाती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ, राष्ट्रीय गौर बंजारा क्रांती संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, लहुजी क्रांती मोर्चा, इंडियन मेडीकल प्रोफेशनल असोसिएशन, इंडियन लॉयर्स असोसिएशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, ओबीसी महासभा, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा या संघटनांनी समर्थन दिले आहे.


बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती, असोसिएटेड ऑफ इंडस्ट्री बिझनेस ऍन्ड ट्रेड, राष्ट्रीय मागास वर्ग मोर्चा, प्रोटान, संविधान बचाओ संघर्ष समिती, वाल्मिकी मजहबी सीख समाज, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा, इमारत ए-सरिया, तंजिम आईमा मसाजिद, अधिरे जमाते इस्लामी, तहरिक पैगाम ए इस्लाम, कुल जमाते तंजीम या संघटनांनी भारत बंदला समर्थन दिले आहे.
सुत्रांच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय लोक समता पार्टी, जन अधिकार पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, हम, सीपीआय, मार्क्सवादी, लेनिनवादी, टीएमसी आदी राजकीय दलांसहित अन्य काही राजकीय पक्षांनी भारत बंदला समर्थन दिले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए व एनआरसीविरोधात आंदोलन करणार्‍या महिला कार्यकर्त्यांनीही भारत बंदला समर्थन दिले आहे.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper