×

राज ठाकरेजी..! भारतात हिंदुत्वाचे कार्ड आऊटडेटेड

Published On :    25 Jan 2020
साझा करें:

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि कट्टर मुस्लीम द्वेष एकाच म्यानात कसा?



बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनेचा रंग भगवा होता व राहणार आहे’ असे सांगत आपण भगवा सोडला नसल्याचे स्पष्ट केले. तर गोरेगाव येथे मनसेच्या अधिवेशनात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो’ अशाप्रकारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे शब्द उच्चारून राज ठाकरे यांनी भगवा हाती घेत आपली दिशा स्पष्ट केली. या दोन्ही ठाकरे बंधुंनी भगवा आपलाच असा दावा केला असला तरी भगवा ना शिवसेनेचा ना मनसेचा...भगवा देशातील सर्वोत्तम भूमीपूत्र असलेल्या तथागत गौतम बुध्दांचा आहे. त्यामुळे त्याच्यावर ठाकरे बंधू सोडाच संघ परिवार व भाजपाचीही मालकी नाही.


तथात गौतम बुध्दांना पाली भाषेत ‘भगवान’ म्हणतात. भगवान या शब्दाचा अर्थ देव होत नाही. ‘भग्ग’ म्हणजे नष्ट करणे आणि ‘वान’ म्हणजे मोह, मत्सर, द्वेष, विषमता, वर्णवाद अशा प्रकारच्या ब्राम्हणी दुष्ट संकल्पना. बौध्द धम्मामध्ये असे म्हटले आहे की, ‘भग्गा रागो, भग्गा दासो, भगवा मोहिनी भगवा’ याचा अर्थ असा की, राग, लोभ, मोह, तृष्णा यांचा त्याग केलेला आहे तो ‘भगवान’. तथागतांचे चिवरच काषाय केशरी-भगवे होते. याचा अर्थ भगवा रंग बुध्दांचा आहे. तो रंग बुध्दांची आठवण म्हणून वारकरी संतांनी स्विकारत झेंड्यांसाठी वापरला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचे ‘भगवे’ निशाण ठेवले होते. भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे.  हा खराखुरा इतिहास असताना त्या ‘भगवा’ रंगाचे ब्राम्हणीकरण करण्यात आले. हा ‘भगवा’ रंग आमचा असल्याचे आज संघ परिवार, शिवसेना व मनसे सांगत आहे, हे लोक धादांत खोटे बोलत आहेत.


राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. मी मराठीदेखील आहे आणि हिंदूदेखील आहे. माझ्या ‘मराठीला’ कुणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर अंगावर जाईन आणि माझ्या ‘धर्माला’ हात लावण्याचा प्रयत्न केला तर ‘हिंदू’ म्हणून अंगावर जाईन अशी त्यांनी गर्जना केली. त्याचबरोबर बांग्लादेश, पाकिस्तानमधील आलेल्या मुस्लीमांना बाहेर हाकलण्यासाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येईल असे त्यांनी आवाहन केले. एकप्रकारे राज ठाकरे यांनी एनआरसी व सीएएचे समर्थन केले आहे. मनसेने आपल्या झेंड्यात रयतेते राजे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्राही घेतली आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा स्विकारत आहात तर त्यांची नीतीही माहित असायला हवी. शिवाजी महाराजांचे नाव आणि कट्टर मुस्लीम द्वेष एकाच म्यानात राहू शकत नाहीत. शिवाजी महाराजांनी कधीच मुस्लीम द्वेष केला नाही. उलट त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सरदार होते. सिध्दी वहाब, सिध्दी हिलाल, अंगरक्षक सिध्दी इब्राहीम, पहिला सरनोबत नूरखान बेग, विश्‍वासू सेवक मदारी मेहतर, वकील काझी हैदर, खास मित्र रूस्तुम-ए- जमाल, आरमाराचा पहिला सुभेदार दर्या सारंग, आरमारप्रमुख दौलत खान, तोफखानाप्रमुख इब्राहीम खान, शिवाजी महाराजांचे पहिले चित्र काढलेले मीर महंमद अशी कितीतरी नावे मुस्लीम सरदारांची सांगता येतील. याचा अर्थच शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. परंतु ब्राम्हणी इतिहासकारांनी खरा इतिहास सांगितलाच नाही आणि खोटा इतिहास लोकांच्या माथी मारला. तोच इतिहास बहुधा राज ठाकरेंनी वाचला असावा. म्हणून ते कट्टर मुस्लीम विरोधाची भूमिका निभावताना दिसत आहेत. एवढेच कशाला राज ठाकरेंनी आपले आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची ‘दगलबाज शिवाजी’ व ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ ही दोनच पुस्तक वाचली असती तर त्यांनी मुस्लीमविरोधी गरळ ओकली नसती. जे लोक आपले आजोबांचे विचार अंगिकारत नाहीत ते लोक लोकांचे काय भले करणार?


एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करायचा आणि दुसर्‍या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या पुण्यातील भांडारकर संस्थेची माफी मागायची. ही कुठली नीती. ब.मो.पुरंदरे नामक बोगस इतिहासकाराला हाताशी धरून जेम्स लेन नामक लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. तेव्हा शिवसैनिकांनी भांडारकर संस्थेला जाब विचारला होता. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार्‍या भांडारकर संस्थेला जाब विचारण्याऐवजी राज ठाकरे यांनी शिवसैनिकांनाच तंबी देत भांडारकरचे बहुलकर यांची माफी मागितली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे खणखणीत नाणे आहेत. त्यांच्या विचारांवर जीव ओवाळून टाकणारी लोकं आहेत. म्हणून त्यांच्या नावाचा वापर करून धार्मिक ध्रुवीकरण करून राजकीय स्वार्थ साधायचा एवढाच यामागे हेतू आहे.


राज ठाकरे स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असतील तर ज्या षड्यंत्रकारी मेंदूने त्यांच्या डोक्यात भरले आहे त्या ब्राम्हणांना विचारा तुम्ही हिंदू आहात का? त्याचे उत्तर नकारार्थी असेल. केवळ हिंदू या शब्दाचा वापर करून राजकीय सत्ता ताब्यात घेणे एवढेच लक्ष्य आहे. एनआरसी व सीएएला अप्रत्यक्ष समर्थन देणार्‍या राज ठाकरे यांनी खरा इतिहास वाचलेलाच नाही. त्यामुळे ते सहज संघ परिवार व भाजपाच्या जाळ्यात अडकले आहेत. एनआरसी व सीएए हा मुद्दा घेणारे ब्राम्हणच विदेशी असल्याचे डीएनएच्या आधारावर समोर आले आहे. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी आरएसएसमधील ब्राम्हणांच्या सांगण्यावरून एनआरसी व सीएए मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. संघ परिवार ज्यांना घुसखोर ठरवत आहे ते एससी, एसटी, ओबीसी आहेत. आसाममध्ये ज्या १९ लाख लोकांना एनआरसीमधून बाहेर काढण्यात आले आहे त्यात ५ लाख मुस्लीम सोडले तर १४ लाख एससी, एसटी, ओबीसी आहेत. म्हणजे हा सीएए हा कायदा एससी, एसटी, ओबीसीविरोधी आहे. परंतु संघ परिवार, भाजपा, कॉंग्रेस, मनसे, मीडियादेखील हा मुद्दा मुस्लीमांचा भासवत आहेत. यामागे धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदू-मुस्लीम असा रंग देऊन स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा संघ परिवाराचा डाव आहे.


मध्यंतरी राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी त्यांनी काही राजकीय नेत्यांची भेटही घेतली होती. ते ईव्हीएमविरोधात आंदोलनही करणार होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. त्यामुळे त्यांच्यामागे ईडीचा समेमिरा मागे लावून भाजपाने त्यांच्यावर दबाव टाकला. त्या दिवसापासून राज ठाकरेंची ईव्हीएमविरोधी घोषणा हवेत विरली ती कायमची. आपल्याला महाराष्ट्रात राजकीय स्पेस मिळत नाही म्हणून त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेत ब्राम्हणवादाला मजबूत करण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे राज ठाकरे यांना राजकीय पोळी भाजता येईलही परंतु समाजाचे मात्र ते नुकसान करणार आहेत. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणारी राज ठाकरेंची मनसे काय अथवा शिवसेना काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर कॉंग्रेसचे सॉफ्ट हिंदुत्व आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांवेळी कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मीदेखील ‘जनेऊधारी ब्राम्हण’ असल्याचे सांगितले आहे. म्हणजे आम्हीदेखील हिंदुत्ववादी असल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी कबूल केले आहे.


शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला हाताशी धरून राज्याची सत्ता हस्तगत केली. म्हणजे शिवसेनेचे जे हार्ड हिंदुत्व होते ते त्यांनी सॉफ्ट केले. म्हणून हार्ड हिंदुत्वाचा पत्ता फेकून राज ठाकरेंनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व मान्य की वि.दा.सावरकरांचे हिंदुत्व मान्य आहे? आपल्या आजोबांचे हिंदुत्व राज ठाकरेंना मान्य नसावे. म्हणूनच त्यांनी प्रथमत: विचारपीठावर सावरकरांचा फोटो लावून आपली दिशा स्पष्ट केली. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे मुस्लीमविरोधी आहे. तशीच भाषा राज ठाकरेंनी वापरली आहे. परंतु हिंदुत्वाचे कार्ड आता देशात चालणार नाही. कारण ते आऊटडेटेड झाले आहे. लोक जागृत झाले आहेत. बहुजन समाजाला शत्रू कोण आणि मित्र कोण याची ओळख झाली आहे.  त्यामुळे संघ परिवार, शिवसेना व मनसेच्या नौटंकीला लोक भुलणार नाहीत. आपली रसातळाला गेलेली राजकीय पत मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे सर्व संघ परिवार व भाजपाच्या इशार्‍यावर सुरू आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाचे कट्टर विरोधक असलेले राज ठाकरे भाजपाच्या कळपात शिरले तर नवल वाटायला नको.


दिलीप बाईत

९२७०९६२६९८


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper