×

यूपी पोलिसांचे कौर्य : सीएएविरोधातील आंदोलकांवर कमरेच्यावर गोळीबार

Published On :    26 Jan 2020
साझा करें:

‘स्टुडंट्स रिपोर्ट ऑन पोलिस ब्रुटॅलिटी अँड आफ्टरमॅथ’ अहवाल



उत्तर प्रदेश: नागरिकत्व दुरुस्ती कायदाच्या (सीएए) विरोधात उत्तर प्रदेशात विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी पोलिसांनी जमावावर केलेला गोळीबार कमरेच्यावर होता. महत्त्वाचे उत्तर प्रदेश पोलिसांनी मुस्लिम समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीत जगणारे वेठबिगार, कष्टकरी, भंगार विक्री करणारे, छोटे ढाबे चालवणार्‍यांना आपले विशेष लक्ष केल्याचा आरोप ‘स्टुडंट्स रिपोर्ट ऑन पोलिस ब्रुटॅलिटी अँड आफ्टरमॅथ’ या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल देशातील सुमारे ३० विद्यापीठातील मुलांनी मेरठ, मुझफ्फरनगर, अलिगड, बिजनौर, फिरोजाबाद, सहारनपूर, भदोही, गोरखपूर, कानपूर, लखनऊ, मऊ व वाराणसी जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष लोकांशी, पीडितांशी बोलून केला आहे.


हे विद्यार्थी १४ ते १९ जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यात जाऊन आले आणि तेथील लोकांशी चर्चा करून, पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेले, गोळीबारात ठार झालेल्या कुटुंबियांशी या मुलांनी चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे.


या अहवालात उत्तर प्रदेश पोलिसांचा अमानुषपणा उघडपणे मांडण्यात आला असून आंदोलन उधळून लावण्यासाठी किंवा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अन्य उपाय न योजता थेट आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात पोलिसांचे लक्ष्य अल्पवयीन मुले होती. वास्तविक पोलिसांच्या नियमावलीत जमावावर गोळीबार करताना कमरेच्या खाली गोळी मारण्याच्या सूचना असतात पण या मूलभूत सूचनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून केवळ मुस्लिम आहेत म्हणून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.


उत्तर प्रदेश पोलिसांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पकडण्यासाठी अनेक गनिमे कावे तंत्रे वापरली. त्यात रात्री बेरात्री एखाद्याच्या घरात घुसून, त्या घराची मोडतोड करून कोणतेही पुरावे नसताना घरातील प्रमुख पुरुषांना अटक केली. अनेकवेळा घरातील सामानाची नासधूस करताना ही नासधूस आम्ही नाही तर आंदोलकांनी केली असे सांगण्याची धमकीही पोलिसांनी दिली.


महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले म्हणून उत्तर प्रदेश सरकारने आंदोलकांकडून नुकसान भरपाई मागितली होती. त्यांनी मुरादाबादमध्ये २००, लखनौत ११०, गोरखपूरमध्ये ३४, फिरोजाबादमध्ये २९, संभलमध्ये २६ नोटीस पाठवल्या होत्या व आंदोलकांकडून नुकसानभरपाई वसूल केली होती. पोलिस एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी काही संशयितांचे छायाचित्रे वर्तमानपत्रे, भित्तीपत्रे व होर्डिंगच्या माध्यमातून सार्वजनिक केले होते. तर हजारो व्यक्तींचा ज्यांचा या आंदोलनाशी संबंध नाही अशांची नावे आपल्या दफ्तरी नोंद करून लोकांना धमकावले होते. आपले नाव यादीतून कमी करण्यासाठी पैसेवसुली पोलिसांनी चालू केली होती. जे आंदोलक पोलिस गोळीबारात ठार झाले त्यांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यातही पोलिस टाळाटाळ करत होते. त्याचबरोबर मृतदेहही कोणते धार्मिक विधी न करता मोठ्या पोलिस बंदोबस्तात दफन केले जात होते.


उत्तर प्रदेश पोलिसांचा हा अमानुषपणा मृतदेहांच्या पोस्टमार्टमध्येही दिसून आला. पोस्टमार्टम झालेले मृतदेहही पोलिस संबंधितांच्या कुटुंबियांना देत नसतं. आता एक महिना होऊनही काहींचे पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप पोलिसांनी दिलेले नाहीत. काही ठिकाणी गोळीबारातील जखमींना इस्पितळात दाखल करतानाही पोलिस हस्तक्षेप करत होते. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्याने मृतांची संख्याही वाढली होती. जे जखमी होते त्यांच्या कुटुंबियांना एक्स रे किंवा तत्सम रिपोर्टही पोलिस देत नव्हते. आपले कौर्य लपवण्यासाठी पोलिसांनी ठार मारलेल्या मुस्लिम व्यक्ती पोलिस गोळीबारात नव्हे तर गँगवॉरमध्ये मारल्या गेल्याच्या कहाण्या तयार केल्या. पोलिसांनी अनेक मृतांची साधी फिर्यादही नोंद केली नाही.


दंगल भडकवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व भाजपचे काही नेते पुढे

या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व भाजपचे काही नेते दंगल भडकवण्यासाठी पोलिसांची मदत करत होते. तसेच या मंडळींनी मुस्लिमांच्या घरांची मोडतोडही मोठ्या प्रमाणात करून शेकडो लोकांना मारहाणही केली होती, असे म्हटले आहे. एक विशिष्ट समुदाय डोळ्यासमोर ठेवून त्याच्याप्रती समाजात घृणा निर्माण करणे व त्यातून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण उभे करणे हा पोलिसांचा व प्रशासनाचा अनेक वर्षांचा एक व्यापक अजेंडा आहे, असेही मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

या अहवालानुसार उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यातील २३ हून अधिक व्यक्तींना पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. त्यात वाराणसीमध्ये ८ वर्षांचा मुलगा सागीरही आहे. पोलिसांनी आंदोलकांविरोधात ३२७ गुन्हे दाखल केले असून १,११३ जणांना ताब्यात घेतले आहे, त्यामध्ये काही अल्पवयीन मुलेही आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी खबरदारी म्हणून ५,५५८ जणांनाही ताब्यात घेतले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
नायरच्या विभागप्रमुखाला उच्च न्यायालयाचे समन्स
बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्य
इंटरनेट बंदीने अर्थव्यवस्थेला ३ अब्ज डॉलर्सचा फटका
धक्कादायक! १०० महिलांना विवस्त्र करत घेतली मेडिकल टेस्ट
१५ कोटींचा ठेका तुला कुणी दिला? तू कुणाकडे नोकरी करतोस?
भाजपच्या सांगण्यावरुन वारिस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव
भारतात अनु.जातीवर अत्याचारात वाढ, राज्य व केंद्र सरकार ढ
‘कोरोना’चे तब्बल २ हजार २३६ बळी
नसबंदी करण्यात अपयश आल्यास वेतन कपात
‘नथ्थ्या अजून जिवंत आहे’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper