×

मुझफ्फरपूर लैंगिक अत्याचार : ब्रजेश ठाकूरसह अकरा आरोपींना आजन्म कारावास!

Published On :    12 Feb 2020
साझा करें:

दिल्ली न्यायालयाचा निकाल



नवी दिल्ली : देशभर खळबळ माजविणार्‍या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील निवारागृहातील मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार ब्रजेश ठाकूर याला मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी हे आदेश देताना अन्य अकराजणांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तत्पूर्वी २० जानेवारी रोजीच न्यायालयाने ठाकूरला याप्रकरणी दोषी ठरविले होते.


मुझफ्फरपूर येथील निवारागृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्यानंतर देशभर खळबळ निर्माण झाली होती, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ब्रजेश ठाकूरने बड्या नेत्यांनाही या मुलींचे लैंगिक शोषण करण्यास भाग पाडल्याचे उघड झाले होते. कधीकाळी याच ठाकूरने बिहार पीपल्स पार्टीच्या (बीबीपी) तिकिटावर निवडणूकदेखील लढविली होती. न्यायालयाने दिलेल्या १ हजार ५४६ पानांच्या निकालपत्रामध्ये ठाकूर याला विविध कलमांखाली दोषी ठरविण्यात आले असून यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, धारदार शस्त्रांनी हल्ला करत जखमी करणे, स्वत:हून हल्ला करणे आदी ठपके त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी सीबीआयने ४ फेब्रुवारी रोजी ठाकूरसाठी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी केली होती. बलात्कार हा बळ आणि वासनेचा गुन्हा असून दोषीला कुठल्याहीप्रकारची दया माया दाखविता कामा नये; कारण याप्रकरणातील पीडित हे अल्पवयीन असल्याचे सीबीआयने म्हटले होते.याप्रकरणातील अन्य पाच दोषी ब्रजेश ठाकूर, दिलीपकुमार वर्मा, रवी रोशन, विकास कुमार, विजय कुमार तिवारी यांनी या प्रकरणामध्ये मुलींचा लैंगिक छळ करत त्यांच्यावर बलात्कार देखील केला, त्यांचे हे कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याने त्यांना कायम लक्षात राहील अशी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी सरकारी वकील अमित जिंदाल यांनी न्यायालयामध्ये केली होती.


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्मा, बालकल्याण समितीचा सदस्य विकास, गुड्डू पटेल, किशन कुमार आणि रामानूज ठाकूर यांना पॉक्सोअंतर्गत मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून गुन्हेगारी कट आखणे, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि बलात्कारासाठी इतरांना चिथावणी देणे आदीप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य आरोपी रामा शंकर सिंह आणि अश्वेनी या दोघांवर गुन्हेगारी कट आखणे आणि बलात्कारासाठी चिथावणी देणे असे ठपके ठेवण्यात आले आहेत. याचप्रकरणातील महिला आरोपी शाहिस्ता परवीन, इंदू कुमारी, मिनू देवी, मंजू देवी, नेहा कुमारी, हेमा मसीह, किरण कुमारी यांच्यावरही गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे, बलात्कारासाठी चिथावणी देणे, मुलांसोबतचे क्रौर्य तसेच आयोगास या प्रकरणाची माहिती न देणे आदीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, मुझफ्फरपूरमधील हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली होती. बिहारच्या तत्कालीन समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांचे पती आणि ब्रजेश ठाकूर यांचे संबंध उघड झाल्यानंतर वर्मा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper