×

सीएएची मॉं ईव्हीएम, कॉंग्रेस दादी..!

Published On :    12 Feb 2020
साझा करें:

ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेत वामन मेश्राम यांनी भाजपा-कॉंग्रेसची काढली पिसेमंड्या: ईव्हीएममुळे सीएए, एनआरसी, एनपीआर आणण्यात आले आहे. सीएएची मॉं ईव्हीएम असून कॉंग्रेस दादी आहे अशा शब्दात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी भाजपा-कॉंग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची अक्षरश: पिसे काढली. कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर मौलाना हमीद अझहरी, विकास चौधरी-पटेल, नीशा मेश्राम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


मेश्राम म्हणाले, सीएए, एनआरसी, एनपीआर भाजपाच्या माध्यमातून आणण्यात आले. भाजपामध्ये नरेंद्र मोदी सर्वात मोठे नेते नाहीत. मोदी हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची चादर उचलणारे कार्यकर्ते आहेत. हे बर्‍याच लोकांना माहित नाही. वाजपेयी, अडवाणींची चादर उचलणार्‍यांना मोदींनी ३०३ जागा कशा मिळवल्या हाच खरा प्रश्‍न आहे. त्याला कारण ईव्हीएम घोटाळा आहे. वाजपेयी, अडवाणी यांनी सारी ताकद पणाला लावूनही त्यांना १८२ जागांपर्यंत मजल मारता आली होती. डॉ.सुब्रमण्यम स्वामी, जी.व्ही.नरसिंहराव यांनी ईव्हीएम घोटाळ्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना तत्कालीन सरन्यायाधीश पी.सदाशिवम यांनी केवळ ईव्हीएम मशीनमुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाहीत असे सांगितले होते. याचा दुसरा अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा होतो असा होतो. ईव्हीएममुळेच सीएए, एनआरसी, एनपीआर आणण्यात आले आहे. त्यामुळे सीएएची मॉं ईव्हीएम असून कॉंग्रेस दादी आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.


केंद्रात कॉंग्रेसचे ५१ खासदार आहेत. विरोधी पक्षामुळे ईव्हीएम आहे. राफेलवर कॉंग्रेस रान पेटवते परंतु ईव्हीएम घोटाळ्यावर चकार शब्द काढत नाही हा कॉंग्रेस व भाजपामधील गुप्त समझोत्याच्या कारभार आहे. ईव्हीएम मशीन चोर आहे तर निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहे असा आरोपही मेश्राम यांनी केला. मी जे बोलतोय एफआयआर दाखल करा, बघतोच मी असा इशाराही त्यांनी दिला. कॉंग्रेस जर विरोधी पक्षात आहे तर त्यांनी ईव्हीएमला विरोध करायला हवा, परंतु ते करत नाहीत. ईव्हीएम आणून लोकतंत्राची हत्या करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या अभिषेक मनुसंघवी, भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी, कम्युनिस्टचे सीताराम येचुरी या तीन ब्राम्हणांनी ईव्हीएमचे संकट भारतावर थोपवले असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.


व्हीव्हीपॅटची गणती होऊ नये म्हणून कॉंग्रेसने फेब्रुवारी २०१४ मध्ये ५६ (सी), ५६ (डी) आणि ४९ एमए असे असंविधानिक नियम बनवले. म्हणजे भाजपाला जिंकून आणण्यासाठी कॉंग्रेसने मदत केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३७३ ठिकाणी घोटाळा करण्यात आला. २२० ठिकाणी जास्त मते आणि १५३ ठिकाणी कमी मते मिळाली. ५४.५ लाख जास्त मते कशी काय निघाली? असा सवाल करतानाच यामध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. निवडणूक आयोगाविरोधात आपण दुसरा खटला दाखल करणार असल्याचा इशारा मेश्राम यांनी दिला.


यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अझहरी यांनीही आपल्या भाषणात शासक वर्गावर सडकून टीका केली. काही विदेशी शक्ती भारतावर हुकुमत गाजवत आहे. भारताला नुकसान करण्याचे प्रयत्न करत आहे. भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी याच विदेशी शक्तीने विभाजन केले. सावरकरांना १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी इंग्रजांकडून पैसे मिळत होते. म्हणजेच सावरकर इंग्रजांचे हस्तक होते. सावरकरांनी येथील लोकांमध्ये द्वेष निर्माण केला. द्वेष निर्माण करूनच ब्राम्हणवादी शक्ती स्वत:ची पोळी भाजत आहे असे मौलाना अहझरी म्हणाले.


शाहीनबागमध्ये सीएएविरोधात ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस महिला रस्त्यावर आल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षड्यंत्र ब्राम्हणवादी शक्ती करत आहेत. हिंदूच्या नावाखाली ब्राम्हण धर्म थोपवण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे प्रयत्न सफल होणार नाहीत. एससी, एसटी, ओबीसीला हिंदू बनवून त्यांच्यावर ब्राम्हणी गुलामी थोपवण्याचे षड्यंत्र आहे. मुस्लीमांनी भारताला हिंदुस्तान म्हणू नये असे आवाहन अझहरी यांनी केले. नरेंद्र मोदी, अमित शहा हे ब्राम्हणांच्या हातातील बाहुले आहेत. दोघेही ४२० आहेत. नागरिकता छिनली जाईल. आज हजारो शाहीनबाग निर्माण झाले आहेत, भविष्यात लाखो शाहीनबाग बनणार आहेत असा विश्‍वास व्यक्त करतानाच निर्दोष लोकांचे रक्त सांडण्यात येत असल्याने भाजपाला लोक माप करणार नाहीत असे अझहरी यांनी स्पष्ट केले.


यावेळी राष्ट्रीय मागास मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल म्हणाले, मुस्लीमांची भीती दाखवून ब्राम्हणांनी भारतावर कब्जा केला. म्हणून इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडण्याअगोदर ब्राम्हणांच्या गुलामीतून स्वतंत्र व्हा असे आपले महापुरूष सांगत होते. आज देशात एससी, एसटी, ओबीसी व सर्व मायनॉरिटीची हालत खराब आहे. एससीला राष्ट्रपती बनवले जाते परंतु त्याला मंदिरात प्रवेश दिला जात नाही हे कशाचे लक्षण आहे. आदिवासींना ५ वी ६ व्या अनुसूचित स्वतंत्र अधिकार आहेत. परंतु आदिवासींच्या जमीनी पुंजीपतींच्या घशात घालण्यात येत आहेत. जो आदिवासी विरोध करेल त्याला नक्षलवादी ठरवले जाते. सिखांच्या कत्तली करण्यात आल्या. लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी झगडत आहेत. गौरी लंकेश, कलबुर्गी यांची हत्या झाली. ख्रिश्‍चनांच्या चर्चवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांच्या घरी कुठली बिर्याणी शिजत आहे याची विचारणा आरएसएसच्या गुंडांकडून केली जाते. या देशात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या ओबीसींची जातनिहाय जनगणनाच होत नाही. नरेंद्र मोदी स्वत:ला ओबीसी समजतात. परंतु त्यांनी सर्वात जास्त निर्णय ओबीसींविरोधात घेतले आहेत. याचा अर्थ मोदी मोहन भागवतांचे गुलाम आहेत. ब्राम्हण सांगतात तसे निर्णय घेतले जात आहेत. आता ओबीसींची गणतीच नाही तर केंद्राच्या अर्थसंकल्पात फुटकी कवडीही नाही असे पटेल यांनी सांगितले.


देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. जो स्वत: विदेशी आहे तो येथील लोकांकडे कागदपत्रे मागत आहे. ब्राम्हण युरेशियावरून आले आहेत. म्हणून आपले महापुरूष म्हणायचे इंग्रजांच्या अगोदर येथील लोकांनी ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हावे. मुस्लीमांची भीत दाखवून भारतावर ब्राम्हणांनी कब्जा केला. एससी, एसटी, ओबीसी हिंदू नाहीत, परंतु त्यांना जबरदस्तीने हिंदू बनवले जात आहे. सम्राट अशोकांच्या कालखंडात भारतात समता होती. त्यांचे राज्य रशियापर्यंत होते. सिंधुघाटी सभ्यता होती, त्यावेळी मूलनिवासी शासक होते. सोन्यासारख्या असणार्‍या या देशाला विदेशी युरेशियन ब्राम्हणांनी कंगाल बनवले. रामाच्या नावावर ओबीसीला झुंजवण्यात आले. त्याला हक्क व अधिकार नाकारण्यात आले. राम मंदिर ट्रस्टमध्ये एकही ओबीसी नाही. राम मंदिर ट्रस्ट ब्राम्हणांच्या कमाईचा अड्डा बनणार आहे अशी भीतीही पटेल यांनी व्यक्त केली. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper