×

किंमती कडाडल्या! घरगुती गॅसच्या दरांत १५० रुपयांची वाढ

Published On :    12 Feb 2020
साझा करें:

केंद्रातील भाजपा सरकारने लोकांना जगणे केले मुश्कील



नवी दिल्ली:  सामान्य ग्राहकांना महागाईचा पुन्हा एकदा झटका बसलाय. सर्व महानगरांत घरगुती इण्डेन गॅसच्या दरांत पुन्हा एकदा वाढ घोषित करण्यात आलीय. इंडियन ऑईलनं विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर केलीय. ही वाढ आजपासून लागू झालीय. यापूर्वी, १ जानेवारी २०२० रोजी घरगुती गॅसच्या किंमतींत वाढ घोषित करण्यात आली होती.


अर्थातच, आर्थिक राजधानी मुंबईत आता विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत १४५ रुपयांची वाढ करण्यात आलीय. तर राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिल्लीत आता १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ८५८.५० रुपये मोजावे लागणार आहेत.


भाववाढीनंतर कोलकातामध्ये नागरिकांना १४९ रुपये जास्त मोजून ८९६ रुपयांना गॅस सिलिंडर विकत घेता येईल तर चेन्नईमध्ये १४७ रुपयांच्या वाढीसहीत गॅस सिलिंडरचे दर ८८१ रुपयांवर पोहचले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सबसिडी आणि बदलत जाणार्‍या बाजार भावानुसार घरगुती गॅसच्या किंमतीतही बदल होतो. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दरांत कोणताही बदल झालेला नव्हता. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत २२४.९८ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्या व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर १५५०.०२ रुपयांना मिळतोय. यावेळी घरगुती गॅसच्या किंमतीत मात्र वाढ झाली नव्हती. घरगुती गॅसचे एकूण २७.६ कोटी उपभोक्ते आहेत. यातील जवळपास दोन कोटी नागरिकांना सबसिडीचा लाभ घेता येत नाही.


अनुदानित गॅसच्या किंमतींतही गेल्या सहा महिन्यांत १३ टक्क्यांनी अर्थात ६२ रुपयांनी वाढलेत. सरकारनं फ्युएल सबसिडीमध्ये कपात केल्यानंतर तेल कंपन्यांनी किंमती प्रकाशित करणं बंद केलंय. त्यामुळे एलपीजीच्या वाढलेल्या किंमतींवर कुणाचं फारसं लक्ष गेलं नव्हतं.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘सीएए’ला विरोध करणार्‍यांवर सरकारने गोळीबार करावा
हिंमत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा नि
भाजपा सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा
माझा घटनेवर पूर्ण विश्‍वास पण कोर्टावर नाही
भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
केंद्राने जीएसटीचे १५ हजार कोटी थकविल्याने राज्यापुढे
मंदीचा सामना करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार फटक
तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफ
अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर
ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौर्‍यावर १०० कोटी
सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत
दिल्ली पोलिसांचा जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका
....मग सात दिवसांचा पगार का?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper