×

दिल्लीत निवडून आलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही जास्त आमदारांवर गुन्हे

Published On :    13 Feb 2020
साझा करें:

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस्कडून माहिती



नवी दिल्ली: दिल्लीत निवडून आलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही जास्त आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् अर्थात एडीआर संस्थेकडून बुधवारी देण्यात आली. दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक ६२ जागा तर भाजपने ८ जागा जिंकल्या. दुसरीकडे या निवडणुकीत कॉंग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.


पक्षनिहाय विचार केला तर निवडणूक लढविणार्‍यांमध्ये आपचे सर्वाधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. निवडून आलेल्या ७० पैकी ४३ आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील गंभीर गुन्ह्यांची संख्या ३७ इतकी आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये हत्येचा प्रयत्न, बलात्कार, महिलांवरील अत्याचार व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. महिलांच्या विरोधातील गंभीर गुन्ह्यांची संख्या १३ इतकी आहे. याशिवाय बलात्काराशी संबंधित एका गुन्ह्याची नोंद आहे.


मावळत्या विधानसभेत विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या २४ इतकी होती. लवकरच स्थापन होणार्‍या विधानसभेत ही संख्या झपाट्याने वाढणार आहे. आमदारांच्या संपत्तीचा विचार केला आम आदमी पक्षाच्या ४५ आमदारांची संपत्ती एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असून भाजपच्या ७ आमदारांची संपत्ती एक कोटीपेक्षा जास्त आहे. ‘आप’च्या आमदारांची सरासरी संपत्ती १४.९६ कोटी रुपये इतकी आहे तर भाजपच्या आमदारांची सरासरी संपत्ती ९.१० कोटी रुपये इतकी आहे.


‘आप’चे मुंडका विधानसभा मतदारसंघाचे आमदार धरमपाल लकरा हे सर्वाधिक श्रीमंत असून त्यांची संपत्ती २९२ कोटी रुपये इतकी आहे. त्याखालोखाल आपच्याच आर. के. पूरम मतदारसंघातील आमदार प्रमिला टोकस यांची संपत्ती ८० कोटी रुपये इतकी असून पटेलनगरचे आपचे आमदार राजकुमार आनंद यांची संपत्ती ७८ कोटी रुपये इतकी आहे. मंगोलपुरीच्या आप आमदार राखी बिर्ला यांची संपत्ती कमी म्हणजे ७६ हजार रुपये इतकी आहे.  २०१५ मध्ये तत्कालीन विधानसभेतील आमदारांची सरासरी संपत्ती ६.२९ कोटी रुपये इतकी होती. २०२० मध्ये ती दुपटीपेक्षा जास्त वाढून १४.२९ कोटी रुपये इतकी झाली आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘सीएए’ला विरोध करणार्‍यांवर सरकारने गोळीबार करावा
हिंमत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा नि
भाजपा सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा
माझा घटनेवर पूर्ण विश्‍वास पण कोर्टावर नाही
भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
केंद्राने जीएसटीचे १५ हजार कोटी थकविल्याने राज्यापुढे
मंदीचा सामना करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार फटक
तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफ
अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर
ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौर्‍यावर १०० कोटी
सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत
दिल्ली पोलिसांचा जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका
....मग सात दिवसांचा पगार का?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper