×

राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Published On :    13 Feb 2020
साझा करें:

नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश



नवी दिल्ली: विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणार्‍या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचं आदेश न्यायालयानं दिले आहेत.
राजकीय नेते आणि त्यांच्यावरील गुन्हे हा विषय अनेकदा चर्चेला आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी निवडणुका लढवण्यास बंदी आणावी अशीही मागणी अनेक वेळा पुढे आली होती. मात्र, ती चर्चा हवेतच विरली. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.


गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयासमोर गुरूवारी सुनावणी झाली. पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांची निवडीची कारणं, महत्त्वाची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचबरोबर वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल माध्यमातूनही ही माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वीही दिले आहेत महत्त्वाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयानं राजकारणातील गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त करताना अनेक निकाल दिले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी संसदेनं कायदा करावा, अशी सूचना न्यायालयाने यापूर्वी केली होती. त्याचबरोबर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांवरून स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची जाहिरात करावी असा आदेशही दिला होता.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper