×

मराठा आरक्षण : सरकारमुळे ४० जणांचे बलिदान जाणार व्यर्थ

Published On :    13 Feb 2020
साझा करें:

शासकीय नोकरी आणि मदतीच्या घोषणेकडे काणाडोळा



बीड : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघाला; परंतु आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपयांच्या मदतीच्या घोषणेकडे सरकारने काणाडोळा केला आहे. लोकप्रतिनिधीही या विषयावर मूग गिळून गप्प का? असाही प्रश्‍न आहे. या प्रश्नाीसाठी बलिदान दिलेल्या ४० जणांच्या कुटुंबीयांचा मात्र समाजालाही विसरच पडल्याचे दिसत आहे.


गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने समाज नोकरी आणि शिक्षणात मागे होता. समाजाने या प्रश्नाासाठी ४० वर्षे लढा दिला आणि वर्षभरापूर्वी हा विषय मार्गी लागला; पण समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ४० तरुणांचे बलिदान व्यर्थ जाण्याची भीती निर्माण झाली आहे.मराठा क्रांती मोर्चानंतरही गप्प असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. परळीत महिन्याहून अधिक काळ ठिय्या आंदोलन झाले. याचे पडसाद राज्यात उमटले. याचदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यानंतर पाहता-पाहता राज्यात ४० जणांनी समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. विशेष म्हणजे महसूल, पोलिस प्रशासनाच्या अहवालातही ‘आरक्षणासाठी आत्महत्या’ असे नमूद आहे; परंतु याबाबत तत्कालीन सरकारने केलेल्या घोषणेची पूर्तता केली नाही. तर आताचे सरकारही या विषयावर गप्प आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी आणि दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. आताच्या सरकारमधील शिवसेनाही त्या सरकारमध्ये होती आणि त्यांच्या पक्षाचे तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या नोकर्‍या परिवहन महामंडळात देण्याची घोषणा केली. बीडच्या दौर्‍यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशील विषयातील निर्णय जाहीर करायचे नसतात, त्याची पूर्तता करायची असते, आम्ही नियोजन केले’ असे पत्रकार परिषदेत सांगितले; परंतु तेही खोटे निघाले.


विशेष म्हणजे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या लक्षवेधीवर त्याच काळात तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही घोषणेची पूर्तता करण्याचे विधिमंडळात आश्वासन दिले होते; मात्र त्या सरकारने घोषणेची पूर्तता केली नाही आणि आताच्या सरकारनेही या विषयाला पुरती बगल दिल्याचे दिसते.


आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांबाबत मागच्या काळातील आणि आताच्याही लोकप्रतिनिधींना कुठलीही तळमळ नसल्याचे दिसले. या विषयासाठी एकदा आमदार मेटेंनी विषय काढला; पण पालकमंत्र्यांसह आमदार गप्पच आहेत. ‘समाज’ म्हणून पुढे येणारे नेते, लोकप्रतिनिधी आणि संघटनाही शांत आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘सीएए’ला विरोध करणार्‍यांवर सरकारने गोळीबार करावा
हिंमत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा नि
भाजपा सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा
माझा घटनेवर पूर्ण विश्‍वास पण कोर्टावर नाही
भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
केंद्राने जीएसटीचे १५ हजार कोटी थकविल्याने राज्यापुढे
मंदीचा सामना करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार फटक
तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफ
अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर
ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौर्‍यावर १०० कोटी
सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत
दिल्ली पोलिसांचा जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका
....मग सात दिवसांचा पगार का?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper