×

धर्माच्या आधारावर भारत विभाजनाचे षड्यंत्र हाणून पाडणार

Published On :    13 Feb 2020
साझा करें:

ईव्हीम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेत वामन मेश्राम यांचा इशारा



तुमकूर: सीएएसारखा जुलमी कायदा आणून धर्माच्या आधारावर भारताचे पुन्हा विभाजन करण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. हे षड्यंत्र हाणून पाडणार असल्याचा इशारा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी दिला. कर्नाटक राज्यात तुमकूर येथे ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विचारपीठावर राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अझहरी, राष्ट्रीय मागास वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, नीशा मेश्राम उपस्थित होते.


यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएम घोटाळा कसा केला जातो याचे दाखले दिले. ईव्हीएमचा फायदा कॉंग्रेस, भाजपा, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, तृणमूल कॉंग्रेस या ब्राम्हणांच्या राजकीय पक्षांना होतो. एससी, एसटी, ओबीसीला फायदा होत नाही. एवढेच नव्हे तर लक्ष्य निर्धारित करून त्यांना हरवले जाते. ईव्हीएम घोटाळा कॉंग्रेस व भाजपा कसे करीत आहेत याची आपण पोलखोल करीत आहोत. या दोन्ही पक्षांना नंगा करत आहोत. परंतु आजतागायत आपल्याविरोधात साधा एफआयआर दाखल केलेला नाही. कारण आपण पुराव्यांसहित बोलत आहोत. निवडणूक आयोग लोकांना फसवत असल्याने त्यांच्याविरोधात आपण एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा देतानाच ही लोकतंत्र वाचवण्यासाठी लढाई सुरू आहे. आम्ही केवळ मैदानातच नव्हे तर न्यायपालिकेतही लढाई लढत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा कशा मिळाल्या, याचे उत्तर मोदींच्या ताकदीमुळे नाही तर ईव्हीएम घोटाळ्यामुळे एवढ्या जागा मिळाल्या. देशभरात या घोटाळ्याचा पर्दापाश केला जात आहे. त्यासाठीच राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. मुस्लीम एनआरसी, सीएए, एनपीआरबाबत जागृत आहेत परंतु ईव्हीएम घोटाळ्याबाबत जागृती नाहीत असा शेराही त्यांनी मारला. कॉंग्रेस आणि भाजपाच्या नीतीमध्ये कुठलेही मौलिक अंतर नाही. कॉंग्रेसचे हिंदुत्व सॉफ्ट आणि भाजपाचे हिंदुत्व हार्ड एवढाच फरक आहे असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


मोदींनी पाकिस्तानचे नाव घेऊन सीएए बनवला. पाकिस्तानात मुस्लीम नसलेल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना नागरिकता देण्यासाठी हा कायदा आहे. नागरिकता देण्यासाठी असून काढून घेण्यासाठी नाही असे मोदी सांगत आहेत. परंतु मोदी लोकांची दिशाभूल करून खोटे बोलत आहेत असा आरोप मेश्राम यांनी केला. आसाममधील १९ लाख लोकांपैकी १४ लाख ४८ हजार लोक एससी, एसटी, ओबीसी आहेत. तर ५ लाख मुस्लीम आहेत. एनआरसी, एनपीआरमध्ये ‘आर’ आहे, म्हणजे नोंदणी करणे अनिवार्य आहे. कागद दाखवल्याशिवाय नोंदणी होणार नाही. मोदी तुमच्याजवळ तरी कागद आहेत का? असा सवाल करतानाच हां.. तुम्ही प्रधानमंत्री असल्याने अधिकार्‍यांना हाताशी धरून कागदपत्रे बनवू शकता. परंतु सर्वच लोक प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आहेत का? असा टोला त्यांनी लगावला. हा सर्व खेळ सुरू आहे. 


धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण करणे हे मोठे षड्यंत्र आहे. लोकांना गुलाम बनवायचे आहे. कारण गुलामाला स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याचा निर्णय मालक घेत असतो. मुस्लीमांमुळे पाकिस्तान बनले नाही तर नेहरू आणि कॉंग्रेसमुळे भारताचे विभाजन झाले. तसेच पुन्हा एकदा धर्माच्या आधारावर भारताचे विभाजन करण्याचा डाव आखण्यात आला आहे. परंतु हा डाव पूर्ण ताकदीनिशी हाणून पाडू असा इशारा देतानाच अन्यायग्रस्त ८५ टक्के लोक एकत्र आले तर अन्याय करणारे लोक कुठच्या कुठे वाहून जातील. त्यामुळे एकत्रिपणे लढाई लढावे लागेल असे आवाहन मेश्राम यांनी केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘सीएए’ला विरोध करणार्‍यांवर सरकारने गोळीबार करावा
हिंमत असेल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा नि
भाजपा सरकारकडून सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा सपाटा
माझा घटनेवर पूर्ण विश्‍वास पण कोर्टावर नाही
भाजपकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न
कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’
केंद्राने जीएसटीचे १५ हजार कोटी थकविल्याने राज्यापुढे
मंदीचा सामना करणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार फटक
तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या
पानसरेंच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र वाशीच्या खाडीत
पोलीसांसमक्ष अनु.जातीच्या वरातीवर उच्च वर्णीयांची दगडफ
अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर
ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौर्‍यावर १०० कोटी
सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन
सीएएविरोधातील आंदोलने देशद्रोही नव्हेत
दिल्ली पोलिसांचा जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यां
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका
....मग सात दिवसांचा पगार का?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper