×

सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द होईपर्यंत आंदोलन

Published On :    16 Feb 2020
साझा करें:

आझाद मैदानातील महामोर्चात संस्था, संघटनांचा निर्धार



मुंबई: भाजप सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या(एनपीआर) माध्यमातून देशात दुही माजवली आहे. ब्रिटिशांप्रमाणे भाजपही हिंदू-मुस्लीमांना आपआपसात लढवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र देशभर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करून भाजपचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धार शनिवारी मुंबईत ६५ संघटनांनी आयोजित केलेल्या महामोर्चात करण्यात आला.

देशाची तिजोरी रिती करू पाहाणारा, जाती किंवा धर्म भेदाला वाव देणारा, अल्पसंख्यांकांसह बहुजन आणि गोर-गरिबांना वंचित ठेवणारा आणि शेजारील राष्ट्रांमधील विस्थापितांना नाकारणारा कायदा रद्द करावा, ही  मागणी महामोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. एनपीआर, एनआरसी रद्द करण्यात यावे, सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही या मंचावरून करण्यात आल्या.

विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी राष्ट्रीय आघाडी’ने  आझाद मैदान येथे महामोर्चा काढला होता.  आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नायर, प्रदेशाध्यक्ष निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, अभिनेता सुशातसिंग राजपूत उपस्थित होते. आंदोलनाची पुढील भूमिका १९ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल, असे महामोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केले.  देशात तिरस्काराची भावना वाढवण्यासाठी केंद्र सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर कारणीभूत आहे. प्रत्यक्षात सर्व धर्म, जातींनी एकोप्याने नांदावे, ही  नागरिकांची भावना आहे. त्यामुळे तिरस्काराने नव्हे तर प्रेमाने, विश्वासाने सरकारच्या भूमिकेचा विरोध केला जाईल, अशी भूमिका मौलाना अजीज जलील यांनी मांडली.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतात ४० कोटी लोकांना होऊ शकतो कोरोना, आंतरराष्ट्रीय स
असंघटीत आणि बांधकाम मजूरांची नवी नोंदच सरकारकडे नाही! के
१० सरकारी बँकांच्या विलीनीकरणाला आरबीआयची मान्यता, नाव
लोकं पेटून कधी उठणार?
कोरोना व्हायरसमुळे जागतिक मंदीची भीती, विदेशी गुंतवणूक
भारतीयांच्या शरीरात आढळले मायक्रो आरएनए, कोरोनाशी लढण्
कोरोनामुळे सर्वाधिक बाधित असंघटित क्षेत्र
‘कोरोना व्हायरस’मुळे जगभरात २००९ पेक्षाही मोठी आर्थिक
राज्यात दीड वर्षांपासून विषाणू प्रयोगशाळा रेंगाळल्या,
सीतारामन यांच्या पॅकेजमध्ये शेतकरी व मनरेगाला ठेंगा
कोरोनाच्या आडून संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवा
भिलाई स्टील प्लांटच्या कर्मचार्‍यांचा उद्रेक, रेल्वे ट
देशभरातील लॉकडाऊनमुळे उपासमार ही लोकांची समस्या, मजूरा
कोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार,
भारताचा जीडीपी वाढ २.६ टक्क्यांवर जाईल, ८ लाख करोडचा घाटा
डॉक्टरांनाच एन-९५ मास्क आणि पीपीई ग्लोव्हजचा पुरवठा नाह
घनदाट लोकसंख्या असलेल्या भारतात गरीब कसे जगणार?, वर्ल्ड
भारतातील दहा लाख लोकांमागे केवळ १८ टेस्ट, कोरोनाशी कसा क
देशात आर्थिक आणीबाणी लागू करा, सर्वोच्च न्यायालयात याचि
कोरोनाशी युद्ध करणार्‍या आरोग्य खात्यात डॉक्टरांसह १७
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper