×

तामिळनाडूत अनु.जातीच्या युवकाची जमावाकडून हत्या

Published On :    17 Feb 2020
साझा करें:

सात जणांना अटक, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल



चेन्नई : शहरापासून नजीक विल्लुपूरम येथे शक्तीवेल या २४ वर्षीय अनु.जातीच्या तरुणाला तो रस्त्याच्या कडेला शौचास बसल्याच्या कारणावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार मारले. पण या मारहाणीला जातीचे कारणही सांगितले जात आहे. शक्तीवेलची बहीण थिवन्नीने आपल्या भावाला तो अनु.जातीचा असल्याने ठार मारल्याचे पोलिसांना सांगितले. ही घटना गेल्या आठवड्यात बुधवारी घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर आल्याने पोलिसांनी शुक्रवारी सात जणांना अटक केली व या प्रकरणात अन्य काही जणांना अटक केली जाणार असल्याचे चेन्नई पोलिसांनी सांगितले.


शक्तीवेल हा विल्लुपूरम येथे एका पेट्रोल पंपवर काम करत होता. रात्रीचे काम आटपून तो बुधवारी सकाळी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या एका मित्राने कामासाठी फोन करून सोबत आधार कार्ड व फोटो आणण्यास सांगितले.


शक्तीवेल बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घरातून बाहेर पडला पण त्याच्या मोटार सायकलमध्ये पेट्रोल कमी असल्याने तो गाडी ढकलत चालत गेला. त्याने त्याच्या एका मित्राला पेट्रोलसाठी रिकामी बाटली आणण्यास सांगितले. या दरम्यान शक्तीवेलच्या पोटात दुखू लागल्याने तो कळवळून शौचासाठी रस्त्याच्या कडेला बसला.


यानंतर काही वेळेनंतर शक्तीवेलच्या मोबाइल फोनवरून त्याच्या बहिणीला थिवन्नीला एक फोन आला. या फोनमधून एका व्यक्तीने शक्तीवेलला आम्ही बांधले असून तो आमच्या ताब्यात आहे, त्याला न्यायचे असल्यास बुथूर हिल्स येथे यावे, असे त्याने थिवन्नीला सांगितले. थिवन्नीने आपले सहा महिन्याचे मुल व एका नातेवाईकासोबत बुथूर हिल्स गाठले. तेथे तिला शक्तीवेल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या नाकातून, तोंडातून रक्त वाहत होते. सुमारे १५ ते २० जणांच्या तरुणांच्या टोळक्याने शक्तीवेलला घेरले होते. थिवन्नीला पाहताच या टोळक्याने शक्तीवेलला पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली. थिवन्नीने टोळक्याला मारहाण करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले पण तिलाही लाथा मारण्यात आल्या. यात ती व तिचे बाळही जमिनीवर पडले पण उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीने शक्तीवेल व त्याच्या बहिणीला, बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला नाही.


अखेर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहचले. रक्तबंबाळ अवस्थेत शक्तीवेलला एका मोटार सायकलवरून घरी नेण्याचा प्रयत्न केला गेला. पण घरानजीक असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे थिवन्नीने सांगितले. डॉक्टरांनी त्याचा इस्पितळात पोहचण्याआधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. विल्लुपूरमचे पोलिस अधिक्षक डी. जयकुमार यांनी शक्तीवेलला जबर मारहाण झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मृत्यू पावला असे सांगितले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यामध्ये तीन महिला व चार पुरुष आहेत. या प्रकरणी आरोपीवर अनु.जाती-अनु. जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा व कलम ३०२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतात ४० कोटी लोकांना होऊ शकतो कोरोना, आंतरराष्ट्रीय स
असंघटीत आणि बांधकाम मजूरांची नवी नोंदच सरकारकडे नाही! के
१० सरकारी बँकांच्या विलीनीकरणाला आरबीआयची मान्यता, नाव
लोकं पेटून कधी उठणार?
कोरोना व्हायरसमुळे जागतिक मंदीची भीती, विदेशी गुंतवणूक
भारतीयांच्या शरीरात आढळले मायक्रो आरएनए, कोरोनाशी लढण्
कोरोनामुळे सर्वाधिक बाधित असंघटित क्षेत्र
‘कोरोना व्हायरस’मुळे जगभरात २००९ पेक्षाही मोठी आर्थिक
राज्यात दीड वर्षांपासून विषाणू प्रयोगशाळा रेंगाळल्या,
सीतारामन यांच्या पॅकेजमध्ये शेतकरी व मनरेगाला ठेंगा
कोरोनाच्या आडून संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवा
भिलाई स्टील प्लांटच्या कर्मचार्‍यांचा उद्रेक, रेल्वे ट
देशभरातील लॉकडाऊनमुळे उपासमार ही लोकांची समस्या, मजूरा
कोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार,
भारताचा जीडीपी वाढ २.६ टक्क्यांवर जाईल, ८ लाख करोडचा घाटा
डॉक्टरांनाच एन-९५ मास्क आणि पीपीई ग्लोव्हजचा पुरवठा नाह
घनदाट लोकसंख्या असलेल्या भारतात गरीब कसे जगणार?, वर्ल्ड
भारतातील दहा लाख लोकांमागे केवळ १८ टेस्ट, कोरोनाशी कसा क
देशात आर्थिक आणीबाणी लागू करा, सर्वोच्च न्यायालयात याचि
कोरोनाशी युद्ध करणार्‍या आरोग्य खात्यात डॉक्टरांसह १७
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper