×

पोलीसांच्या अंधाधुंद लाठीमारीत विद्यार्थ्याचा डोळा निकामी

Published On :    17 Feb 2020
साझा करें:

जामिया विद्यापीठातील व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी



नवी दिल्ली:  जामिया समन्वय समितीने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी जामिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात मागील वर्षी १५ डिसेंबर रोजी निमलष्करी दल आणि पोलिसांनी केलेल्या लाठीमारीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. ४८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये निमलष्करी दलाचे सैनिक आणि पोलिस   विद्यार्थ्यांना लाठीमार करताना दिसत आहेत. या लाठीमारीत एका विद्यार्थ्याचा डोळा निकामी झाल्याचे झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.


घटनेच्या दिवशी कायद्याचा विद्यार्थी मोहम्मद मिन्हाजुद्दीन देखील जामियाच्या इब्न-ए-सीना (जामियाची जुनी वाचनालय) येथे अभ्यास करत होता.  या घटनेत मिन्हाजुद्दीनचा डावा डोळा निकामी झाला.  मोहम्मद मिन्हाजुद्दीनने इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार अरण्या शंकर यांना सांगितले की, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले आहे ज्याठिकाणी काही लोक मागे लपण्याचा प्रयत्न करीत आहेत.  कारण पोलिसांनी दरवाजावर जोरदार लाथा मारण्यास सुरूवात केली. त्यामुळे प्रत्येकजण घाबरला. अखेर दरवाजा उघडून पोलीस आत शिरले  आणि आमच्यावर लाठीमार सुरू केला. मी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होतो. मला एका हातावर मार लागला आणि मग माझ्या डाव्या डोळ्यावर जोरदार प्रहार करण्यात आला.


मी माझा जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये पळालो असे मिन्हाजुद्दीनने सांगितले. त्यानंतर एक चित्रही व्हायरल झाले ज्यामध्ये माझा चेहरा रक्ताने माखलेला होता. पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप याप्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. जामिया प्रशासनाला फक्त हा विषय दडपून टाकायचा आहे. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला नसता तर हे प्रकरण दाबले गेले असते. पोलिसांनी मला एकदाही बोलवले फोन नाही आणि एफआयआरही दाखल केले नाही.


जामियातील विद्यार्थी ‘द टेलीग्राफ’ या दैनिकाशीही बोलले. त्या दिवशी ग्रंथालयातून बाहेर पडताना एका काचेच्या रॉडने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. वीसहून अधिक निमलष्करी सैनिक आणि पोलिस कर्मचारी आत शिरले. त्यांनी कोणताही इशारा न देता आणि काही प्रश्न न विचारता आम्हाला लाठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. आम्ही तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी बाहेरचा रस्ता रोखला होता. दारात उभ्या असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने माझ्या डोळ्यावर जोरदार प्रहरर केला. मला चक्कर आली पण मी बाहेर पडू शकले नाही, कारण पोलिसांनी सर्व बाहेर जाण्याचे मार्ग बंद केले होते.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर विभाग) प्रवीर रंजन म्हणाले की हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. त्याची चौकशी केली जाईल असे सांगितले.


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोरोनापेक्षा भीतीचा प्रश्‍न मोठा’मजुरांच्या स्थलांत
अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बा
होम क्वारंटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक, आंध
मला सर्व पैसा परत करायचा आहे, बँक-ईडी मदत करत नाही, विजय मल
कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटतील, आशियाच्या अर्थव्यव
कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएच्या सर्व्हेचा संशय, पुणे मह
जगाची महामंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल, विकास दर ५ टक्क्
काय भाजपा सरकारला कोरोनाचे गांभीर्य आहे?लोकांचा उद्वीग
महाराष्ट्राची कोरोना चाचणी क्षमता २,२००; मात्र रोज होतात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉ.कफील खान यांची स
कोरोना मदतीच्या नावावर चीन करतोय कमाई, स्पेनला विकली ३४५
आरएसएसला पाच लाखांची मदत करून मुस्लिम महिलेने पैसे घालव
हॉंगकॉंग निदर्शकांवर सोडले जाणार होते कोरोना जैविक अस्
गोव्यात धान्य पुरवठ्याचा राजकीयीकरणाचा बाजार, गरीबांच
स्थलांतरीत कामगारांना चक्क केमिकलयुक्त पाण्याची अंघोळ,
यवतमाळमध्ये शेतात वीज पडून सहाजण ठार, मृतांमध्ये चार पु
गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्
लॉकडाऊनमुळे सुरक्षा उपकरणांत कमी, डॉक्टरांच्या जीविता
भारताला २१ नव्हे तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन हवा, केम्ब्रीज व
मोफत रेशन घोषणेमुळे आमदाराच्या घरासमोर लोकांचा जमाव, सं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper