×

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’

Published On :    17 Feb 2020
साझा करें:

श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट भुज, गुजरातमधील प्रकार ऐकला तर त्या प्राचार्या बाईंच्या बुद्धीची किव येते. किती नालायकपणा आहे हा. मुलींना जर मासिक पाळी असेल तर त्यांनी शाळेत येण्याची गरज नाही आणि कुणा कुणाला मासिक पाळी आहे हे मुलींचे कपडे काढून बघणे कितपत योग्य आहे?



‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ फक्त कागदावर चांगले दिसत आहे. विद्यापीठामध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनींना मारहाण, शिकणार्‍या विद्यार्थ्यांनीवर पोलीस केसेस, मुलींना दुय्यम वागणूक, मुलींवर बलात्कार करणार्‍या राजकीय नेत्यांना शिक्षेतून माफी, पिडीत मुलीला आरोपीची वागणूक अशा पद्धतीने भारतात सध्या महिलांचा सन्मान करणे सुरू आहे. याचाच अर्थ ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असे म्हणणेच चुकीचे आहे. शिकलेल्या मुलीला जर न्याय मिळत नसेल तर तिला नेमकं शिकवायचं तरी कशाला? मुलीला शिकवून जर ती मुलीचाच द्वेष करत असेल, मुलींना ती समतेची वागणूक देत नसेल तर ते शिक्षण समाजाच्या काय कामाचे? शिकून सवरून डोक्यात घाण विचार असतील तर या शिक्षणाचा फायदा समाजाला होत नाही आणि ज्याचा फायदा समाजाला होत नाही त्याला शिक्षण म्हणत नाही. भारतात महिला प्रश्‍न खूपच गंभीर आहे.


महिलांच्या अस्मितेलाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अस्मितेला काळीमा फासणारी घटना गुजरातमधील भुज येथे घडली. ही घटना वाटतं तेवढी सोपी नाही. महिलांच्या अस्मितेचा व देशाच्या अस्मितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. भारताचे प्रधानमंत्री ज्या राज्याचे आहेत त्याच राज्यात असे घडते याला काय म्हणावे? एखाद्या भक्ताने आपली विद्वत्ता दाखवून त्यात मोदींची काय चूक आहे असे फाजील प्रश्‍न न विचारता सत्य शोधण्याचे काम करावे. श्री सहजानंद गर्ल्स  इन्स्टिट्यूट भुज, गुजरातमधील प्रकार ऐकला तर त्या प्राचार्या बाईंच्या बुद्धीची किव येते. किती नालायकपणा आहे हा. मुलींना जर मासिक पाळी असेल तर त्यांनी शाळेत येण्याची गरज नाही आणि कुणा कुणाला मासिक पाळी आहे हे मुलींचे कपडे काढून बघणे कितपत योग्य आहे? हा प्रकार चिड आणणारा तर आहेच परंतु माफी लायक सुद्धा नाही. ती प्राचार्या बाईंना एक प्रश्न आहे तुम्हाला जर मासिक पाळी असेल तर तुम्ही पगार घेत नाही का? बाई तुम्ही एक महिला आहात आणि महिलांनी जर शिकून सवरून असे वक्तव्य केले तर तर तुमचं शिक्षणाच्या कागदाचा चहा करून प्यावा का? प्राचार्याबाई आपण सावित्रीमाईंमुळे शिक्षण घेऊन मानासन्माची नोकरी करत आहात. त्या सावित्रीमाईंचे विचार सोडून मनुचे विचार स्विकारताना आपल्याला काहीच कसं वाटत नाही. 


बाई आपण सावित्रीमाई फुले यांना कधीच वाचलं नाही का? ज्या संविधानाने तुम्हाला एवढा बहुमान दिला ते संविधान तुम्हाला कधीच वाचण्याची इच्छा झाली नाही का? बरं ते नाही केले तरी चालते पण अशी लज्जास्पद वागणूक मुलींना देण्याची तुमच्याकडे नेमकी कुबुध्दी आली तरी कुठून. महिलेला कोणतेही स्वातंत्र्य न देता गुलामांचे जीवन जगायली मनुस्मृती भाग पाडले. याच मनुस्मृतीने महिलांना दासी म्हणून हिणवले, पशु म्हणून संबोधित केले, अनेक सामाजिक बंधने लादून महिलेमधील स्वाभिमान काढून घेतला. महिलांनी मनुस्मृती जाळून खाक करायला पाहिजे तर भुजसारख्या ठिकाणी काही महिला मनुस्मृतीचे पालन करताना दिसतात. मासिक पाळीच्या वेळी घरात स्वयंपाक करू नये, पिण्याच्या पाण्याला हात लावू नये, पवित्र काम करू नये, पूजा करू नये, घरातील कोणत्याही व्यक्तीला स्पर्श सुद्धा ह़ोऊ नये अशी शिकवण जर धर्मात, धर्मग्रंथात असेल तर त्याला काय म्हणावं. मनु अजूनही जिवंत आहे म्हणून तर असे प्रकार होत आहेत. मासिक पाळी मुळेच स्त्रीचं स्त्रित्व आहे हे आता नव्याने सांगावे का? 


मासिक पाळीमुळे शिक्षण नाकारणार्‍या या व्यवस्थेला जागृत महिलांनी उलथून टाकण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मनु अनेक चुकीच्या गोष्टी लिहून गेला, स्त्रिला उपभोगाची वस्तू म्हणून कलंकित केले, स्त्री अमंगळ, चंचल असे वर्णन करणारा मनू आज शरिरानं जरी नसेल पण विचारानं तो जिवंत आहे. आई त्याच्याच पावलावर पाय टाकून हे मनुवादी लोक येथे दूषित वातावरण निर्माण करत असतात. भारतीय स्त्रिला समाजात मान-सन्माचे स्थान देण्यासाठी अनेक महापुरुष व महानायिकांना संघर्ष करावा लागला. एकेकाळी स्त्रियांचा अवमान करणारे व सन्मान नाकारणारे पुस्तक म्हणजे मनुस्मृती आणि हीच मनुस्मृती येथील धर्मग्रंथाचे काम करायचे. महिलेला एवढं कमी लेखताना मनु सुद्धा विसरून गेला होता की तो एका स्त्रिच्या पोटात नऊ महिने वाढला आहे. स्त्रियांच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसारावर दुर्लक्ष करून महिलांना मान सन्मान मिळवून दिला असला तरी घाण मानसिकता असलेले मनुची पिलावळ अजूनही जिवंत आहेत आणि पिलावळ महिलांनी ठेचून काढायला पाहिजे.


मुलींना लज्जास्पद वागणूक देतांना तेथील महिलांच्या डोक्यात साधा एवढाही विचार येऊ नये की या जर स्वतःची मुलगी असती आणि तिच्यासोबत कोणी असं वागलं असतं तर कसं वाटलं असतं. आज महिला दोन पुस्तके शिकल्या, नोकरी करायला लागल्या परंतु फक्त पुस्तक शिकून कागदाचे ओझे वाढवण्यापेक्षा आपल्या डोक्याची जर सुपिक विचाराने मशागत केली तर विज्ञानवादी फळे नक्की मिळतील. ज्या महिलांना मनुस्मृतीचे चटके माहिती नाहीत, आणि संविधान जाळल्यानंतर घरात बसणार्‍या महिलांनी आता तरी मनुस्मृती समजून घ्यावी. तुम्हाला मासिक पाळी असताना सर्व काही नाकारणारी मनुस्मृती तर तुमच्यामध्ये नैसर्गिक कोणताच भेद न करता तुम्हाला व्यक्ती म्हणून सर्व काही बहाल करणारे संविधान. आज गरज कशाची आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आज जर महिलांची ही परिस्थिती असेल तर संविधान लागू होण्याअगोदर कशी परिस्थिती असेल याची कल्पना सुद्धा करणे कठीण आहे.


धार्मिक ग्रंथ वाचून महिलांच्या डोक्यात फक्त नकारात्मक आणि कमकुवत विचारांची पेरणी ही मनुची पिलावळ करत आहेत म्हणून असे प्रकार घडत आहेत. एकिकडे स्त्री सक्षमीकरणाचा देखावा करणारे दुसरीकडे रस्त्यावर चालताना, शिक्षणासाठी जाताना, मंदीरात, शाळेत महिलांना कुठेच संरक्षण वाटत नाही, भयभीत झालेल्या महिला मनाला धीर देऊन बाहेर पडण्याचे धाडस दाखवत असताना दररोज काही ना चुकीची बातमी ऐकायला मिळते, यामुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण होते. महिलांनी आता खचून न जाता धैर्याने लढा उभा करण्याची गरज आहे. 


आजही मनुस्मृतीनुसार अनेक गोष्टी घडताना दिसत असल्या तरी आपल्याकडे पर्याय आहे संविधानाच्या माध्यमातून आपण न्याय मागू शकतो. संविधान जाळल्यानंतर आपण संविधानासाठी काही केले नसले तरी आपल्यावर काही संकट आले, अधिकारावर बंधन आले तर संविधान न्याय देण्यासाठी तयार आहे. परंतु त्यासाठी ते वाचणे आवश्यक आहे. मनुची पिलावळ संविधान वाचतात व संविधान विरोधी कृत्य करतात. म्हणून संविधान विरोधी लोकांना वठणीवर आणण्यासाठी आपल्याला मनुची पिलं अजूनही ओळखता आली पाहिजेत. कारण मनु अजूनही जिवंत आहे. शिकलेल्या मुलींनी विज्ञानवादी बनून अंधविश्‍वास व अनिष्ट रूढी परंपरा स्वतःहून सोडून दिले दिले पाहिजे तर आपण शिकलो याचे सार्थक होईल.


विनोद पंजाबराव सदावर्ते

मो: ९१३०९७९३००

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोरोनापेक्षा भीतीचा प्रश्‍न मोठा’मजुरांच्या स्थलांत
अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बा
होम क्वारंटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक, आंध
मला सर्व पैसा परत करायचा आहे, बँक-ईडी मदत करत नाही, विजय मल
कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटतील, आशियाच्या अर्थव्यव
कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएच्या सर्व्हेचा संशय, पुणे मह
जगाची महामंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल, विकास दर ५ टक्क्
काय भाजपा सरकारला कोरोनाचे गांभीर्य आहे?लोकांचा उद्वीग
महाराष्ट्राची कोरोना चाचणी क्षमता २,२००; मात्र रोज होतात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉ.कफील खान यांची स
कोरोना मदतीच्या नावावर चीन करतोय कमाई, स्पेनला विकली ३४५
आरएसएसला पाच लाखांची मदत करून मुस्लिम महिलेने पैसे घालव
हॉंगकॉंग निदर्शकांवर सोडले जाणार होते कोरोना जैविक अस्
गोव्यात धान्य पुरवठ्याचा राजकीयीकरणाचा बाजार, गरीबांच
स्थलांतरीत कामगारांना चक्क केमिकलयुक्त पाण्याची अंघोळ,
यवतमाळमध्ये शेतात वीज पडून सहाजण ठार, मृतांमध्ये चार पु
गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्
लॉकडाऊनमुळे सुरक्षा उपकरणांत कमी, डॉक्टरांच्या जीविता
भारताला २१ नव्हे तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन हवा, केम्ब्रीज व
मोफत रेशन घोषणेमुळे आमदाराच्या घरासमोर लोकांचा जमाव, सं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper