×

राज्यात १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा!, रक्तदान शिबिरे ठप्प

Published On :    25 Mar 2020
साझा करें:

कोरोनाच्या भितीपोटी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसह शहरी भागातील रक्तदान शिबिरे ठप्प पडली आहेत. याच्या परिणामी राज्यातील रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या पिशव्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली असून आता केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.



मुंबई: कोरोनाच्या भितीपोटी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरसह शहरी भागातील रक्तदान शिबिरे ठप्प पडली आहेत. याच्या परिणामी राज्यातील रक्तपेढ्यांमधे रक्ताच्या पिशव्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली असून आता केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याला दुजोरा दिला असून लोकांनी गर्दी न करता रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी ६९७७ रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहे. रोज साधारणपणे ८०० ते १००० रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये आजच्या दिवशी ३८,३०८ रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असून राज्याची रोजची रक्ताची गरज ४५०० ते ५००० एवढी असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.


 राज्यातील विविध रुग्णालयात होणार्‍या शस्त्रक्रियांसाठी दरमहा सुमारे सव्वा लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यामातून १७ लाख २३ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ दरमहा राज्यात सव्वा लाख ते एक लाख ४० हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात येत होत्या. गेल्या वर्षी हे रक्त गोळा करण्यासाठी सुमारे २८ हजार रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. 


राज्यात होणार्‍या एकूण रक्तदान शिबिरांपैकी बहुतेक शिबिरे ही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आदी शहरी भागात होत असतात. स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजित करण्यात येत असून करोनामुळे ही शिबिरे जवळपास ठप्प झाल्याचे वेगवेगळ्या रक्त पेढ्यांमधील या शिबिरांचे आयोजन करणार्‍या समाजसेवकांचे म्हणणे आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार लोकसंख्येच्या एक टक्का एवढ्या रक्ताचा साठा असला पाहिजे. राज्यात गेल्या वर्षी यापेक्षा जास्त रक्त जमा झाले होते. प्रामुख्याने मार्च, एप्रिलपासून जूनपर्यंत रक्ताची जास्त गरज लागले, कारण या कालावधीत परीक्षा तसेच लोक गावी जात असल्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावते. 


यातच करोनाच्या भितीमुळे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यास स्वयंसेवी संस्था पुढे येताना दिसत नाही तसेच जेथे शिबिरांचे आयोजन केले जाते तेथे लोक रक्तदानासाठी येत नाहीत. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकार्‍याने केवळ १० ते १२ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले.


राज्यात आजघडीला ३४१ रक्तपेढ्या असून यात ७६ सरकारी तर २६५ खाजगी व निमशासकीय रक्तपेढ्या आहेत. साधारणपणे राज्यात दरमहा २५०० शिबिरे होत असतात. यातील बहुतेक रक्तदान शिबिरे ही शहरी भागात होत असून आज या शिबिरांची संख्या रोडावली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोरोनापेक्षा भीतीचा प्रश्‍न मोठा’मजुरांच्या स्थलांत
अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बा
होम क्वारंटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक, आंध
मला सर्व पैसा परत करायचा आहे, बँक-ईडी मदत करत नाही, विजय मल
कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटतील, आशियाच्या अर्थव्यव
कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएच्या सर्व्हेचा संशय, पुणे मह
जगाची महामंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल, विकास दर ५ टक्क्
काय भाजपा सरकारला कोरोनाचे गांभीर्य आहे?लोकांचा उद्वीग
महाराष्ट्राची कोरोना चाचणी क्षमता २,२००; मात्र रोज होतात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉ.कफील खान यांची स
कोरोना मदतीच्या नावावर चीन करतोय कमाई, स्पेनला विकली ३४५
आरएसएसला पाच लाखांची मदत करून मुस्लिम महिलेने पैसे घालव
हॉंगकॉंग निदर्शकांवर सोडले जाणार होते कोरोना जैविक अस्
गोव्यात धान्य पुरवठ्याचा राजकीयीकरणाचा बाजार, गरीबांच
स्थलांतरीत कामगारांना चक्क केमिकलयुक्त पाण्याची अंघोळ,
यवतमाळमध्ये शेतात वीज पडून सहाजण ठार, मृतांमध्ये चार पु
गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्
लॉकडाऊनमुळे सुरक्षा उपकरणांत कमी, डॉक्टरांच्या जीविता
भारताला २१ नव्हे तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन हवा, केम्ब्रीज व
मोफत रेशन घोषणेमुळे आमदाराच्या घरासमोर लोकांचा जमाव, सं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper