×

पोशाख आणि मास्कअभावी डॉक्टरांच्याही जिवाला धोका, ‘मार्ड’संघटनेची भीती

Published On :    25 Mar 2020
साझा करें:

डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक पोशाख आणि मास्क अद्याप देण्यात आले नसून, ते केवळ कोरोना केंद्रांतील रुग्णांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या जिवाला धोका असल्याची भीती निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने व्यक्त केली आहे.



मुंबई: कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणी केंद्रांसह तापासाठीची ओपीडीही सुरू करण्यात आली. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले अनेक निवासी डॉक्टरही अहोरात्र काम करत आहेत. मात्र, या डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक पोशाख आणि मास्क अद्याप देण्यात आले नसून, ते केवळ कोरोना केंद्रांतील रुग्णांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या जिवाला धोका असल्याची भीती निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने व्यक्त केली आहे.


या संदर्भात ‘मार्ड’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. निवासी डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक किट आणि मास्क उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांसोबत काम करणारे वैद्यकीय कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांच्याही जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे ‘मार्ड’चे म्हणणे असून, रुग्णालयात पोषक आहाराची समस्याही असल्याचे निवासी डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे.


एकच मास्क तीन-चार दिवस वापरला जातो. शिवाय जे डॉक्टर कस्तुरबा तसेच विमानतळावरही काम करतात त्यांचीही व्यवस्थित वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना संसर्ग नसल्याची खातरजमा केली जावी, अशी मागणीही ‘मार्ड’ने केली आहे.


डॉक्टरांनाही हवा पोषक आहार

रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी अनेक सर्वसामान्यांनीही रुग्णालयातील मेसमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे मेसमध्ये शिधाही उरलेला नाही. जेवण कुणालाही नाकारण्यात आले नाही. मात्र, संसर्गजन्य आजारांसाठी उपचार देणार्‍या डॉक्टरांनाही पोषक आहाराची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी फळे, धान्य, सुकामेवा अशा प्रकारची मदत करू इच्छिणार्‍या सामाजिक संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोरोनापेक्षा भीतीचा प्रश्‍न मोठा’मजुरांच्या स्थलांत
अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बा
होम क्वारंटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक, आंध
मला सर्व पैसा परत करायचा आहे, बँक-ईडी मदत करत नाही, विजय मल
कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटतील, आशियाच्या अर्थव्यव
कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएच्या सर्व्हेचा संशय, पुणे मह
जगाची महामंदीच्या दिशेने वेगाने वाटचाल, विकास दर ५ टक्क्
काय भाजपा सरकारला कोरोनाचे गांभीर्य आहे?लोकांचा उद्वीग
महाराष्ट्राची कोरोना चाचणी क्षमता २,२००; मात्र रोज होतात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉ.कफील खान यांची स
कोरोना मदतीच्या नावावर चीन करतोय कमाई, स्पेनला विकली ३४५
आरएसएसला पाच लाखांची मदत करून मुस्लिम महिलेने पैसे घालव
हॉंगकॉंग निदर्शकांवर सोडले जाणार होते कोरोना जैविक अस्
गोव्यात धान्य पुरवठ्याचा राजकीयीकरणाचा बाजार, गरीबांच
स्थलांतरीत कामगारांना चक्क केमिकलयुक्त पाण्याची अंघोळ,
यवतमाळमध्ये शेतात वीज पडून सहाजण ठार, मृतांमध्ये चार पु
गांभीर्य नसलेल्या विरोधी पक्षाच्या डोक्यात दंडुका पडल्
लॉकडाऊनमुळे सुरक्षा उपकरणांत कमी, डॉक्टरांच्या जीविता
भारताला २१ नव्हे तर ४९ दिवसांचा लॉकडाऊन हवा, केम्ब्रीज व
मोफत रेशन घोषणेमुळे आमदाराच्या घरासमोर लोकांचा जमाव, सं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper