×

कोरोनाशी युद्ध करणार्‍या आरोग्य खात्यात डॉक्टरांसह १७ हजार पदे रिक्त! आरोेग्य यंत्रणाचा मृत्यूशय्येवर, डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा

Published On :    27 Mar 2020
साझा करें:

राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७ हजार ५ पदे रिक्त आहेत.



मुंबई: राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७ हजार ५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांपर्यंत तब्बल २ हजार ५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षानुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले आजपर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

गर्भवती महिलांपासून नवजात बालकांपर्यंत सार्‍यांच्याच आरोग्याची काळजी घेणार्‍या आरोग्य विभागाचेच आरोग्य आज पूर्णपणे बिघडले असून आरोग्य संचालकांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पदांपैकी २ पदे रिक्त आहेत तर सहसंचालकांच्या १० पदांपैकी ८ पदे भरण्यात आलेली नाहीत. 

गंभीर बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सहसंचालक साथरोग हे पद रद्द करून त्याऐवजी सहसंचालक खरेदी असे पद निर्माण करण्यात आल्याचा मोठा फटका आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसत आहे. पुणे येथील हंगामी आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनाच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजवावी लागत असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

राज्याच्या आरोग्य विभागाचा पसारा मोठा असून आरोग्य खात्याची तब्बल ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे तेर १०,६६८ उपकेंद्रे आहेत. 

जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये तसेच मनोरुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास सात कोटीहून अधिक रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जातात तर सुमारे साडेचार लाख शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात. राज्यात वर्षाकाठी सुमारे २० लाख बाळंतपणे होत असून यातील आठ लाख बाळंतपणे ही आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात येतात.

तथापि आज जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत. 

बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व सहाय्यकांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

आरोग्य विभाग हा राज्य सरकारकडून कायमच उपेक्षित असून अर्थसंकल्पाचा विचार केला तरी राज्य सकल उत्पन्नाच्या केवळ एक टक्का रक्कम आरोग्य विभागाला दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांचा विचार करता राष्ट्र सकल उत्पन्नाच्या किमान चार टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करणे अवाश्यक असताना देशात तसेच महाराष्ट्रात अवघा एक टक्का रक्कम आरोग्यावर खर्च केली जाते.


 एकीकडे डॉक्टरांसह तब्बल १७ हजार पदे रिक्त तर दुसरीकडे आरोग्य विभागाला मिळणारा तुटपुंजा निधी यातून जेव्हा कोरोनासारखे संकट उभे राहाते तेव्हा आमचे डॉक्टर कोणतीही तक्रार न करता जीवाचे रान करतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ हजार ३८४ जणांवर बेकारीची कुर्‍हाड
विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा का
हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बां
आधीच भारतात ८३ कोटी लोक उपासमारीत त्यात आणखी १ कोटी २० ला
कपिल मिश्राचे विधान लोकांना भडकावणारेच होते
उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार
दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फट
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper