×

राज्यात दीड वर्षांपासून विषाणू प्रयोगशाळा रेंगाळल्या, वेळकाढू धोरणाचा प्रयोगशाळा उभारणीलाही चांगलाच फटका

Published On :    28 Mar 2020
साझा करें:

विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) स्थापन करण्याला ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. मात्र, त्याच्या निधी वितरणास विलंब झाल्याने राज्यात दोन टप्प्यात मंजूर झालेल्या सात ठिकाणच्या प्रयोगशाळा उभारणीची प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळली.



मुंबई: साथींचे आजार व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्याचा भाग म्हणून विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) स्थापन करण्याला ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. मात्र, त्याच्या निधी वितरणास विलंब झाल्याने राज्यात दोन टप्प्यात मंजूर झालेल्या सात ठिकाणच्या प्रयोगशाळा उभारणीची प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळली. विश्‍वव्यापी कोरोना संकटाचे वादळ राज्यात घोंघावू लागल्यानंतर त्या प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. वेळीच त्या प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या असत्या तर राज्यात आणखी सात ठिकाणी कोरोनाचे तात्काळ निदान होणे शक्य झाले असते. शासनाच्या वेळकाढू धोरणाचा प्रयोगशाळा उभारणीलाही चांगलाच फटका बसला आहे.


विषाणूंपासून पसरणार्‍या आजारांचा उद्रेक टाळून वेळीच निदान व उपचाराची अचूक दिशा ठरवण्यासाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्याची योजना आहे. 


यामध्ये नागपूर येथे राज्यस्तरीय तर, वैद्यकीय महाविद्यालय पातळीवर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथे ही प्रयोगशाळा उभारणीचा निर्णय झाला. लातूर आणि मिरज येथेही नंतर प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली. या प्रयोगशाळांमुळे कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाइन फ्लू, मेंदूज्वर, एन्फ्लूएन्झा यासारख्या संसर्ग आजारांचे निदान करणे सहज शक्य होणार आहे.


नागपूर, अकोलासह पाच ठिकाणी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यास व त्यानुषंगाने सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर मिरज आणि लातूरचाही समावेश करण्यात आला. 


मंत्रिमंडळात मंजुरी होऊन तब्बल दीड वर्षांचा कालावधी उलटल्यावरही अद्यापही त्या प्रयोगशाळा स्थापन झाल्या नाहीत. त्यासाठीचा निधी प्रत्यक्षात एका वर्षांनंतर देण्यात आला. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून त्या प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला. त्यासाठी काही यंत्रसामुग्री वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्यात आली आहे, तर उर्वरित यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी हाफकीनमार्फत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. संचारबंदी व बंदमुळे प्रयोगशाळा उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. उभारणी झाल्यावर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची अधिस्वीकृती मिळवावी लागेल. त्यामुळे त्या कार्यान्वित होण्यात आणखी काही दिवसांचा कालावधी जाणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ हजार ३८४ जणांवर बेकारीची कुर्‍हाड
विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा का
हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बां
आधीच भारतात ८३ कोटी लोक उपासमारीत त्यात आणखी १ कोटी २० ला
कपिल मिश्राचे विधान लोकांना भडकावणारेच होते
उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार
दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फट
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper