×

लोकं पेटून कधी उठणार?

Published On :    29 Mar 2020
साझा करें:

लॉकडाऊनमुळे देशातील असंघटित मजूर, कामगार देशोधडीला लागले असून त्यांना आपले घर गाठण्यासाठी हजारो कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. त्यांना ना पाणी, ना अन्न व बालकांसहित घर गाठताना त्यांची दमछाक झाली आहे. काही महिला तान्ह्या बाळासह पायपीट करताना दिसत आहेत. हजारो कि.मी.पायपीट केल्यानंतर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती का आणण्यात आली? त्याला कोण जबाबदार आहे? सरकार म्हणून जबाबदारी आहे की नाही?



कोरोना विषाणूने चीन, इटली, अमेरिकासारख्या देशांना वेढले असताना भारतातही त्याने हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. भारतातही १ हजारांच्या आसपास कोरोनाबाधित झाले आहेत. आजपर्यंत २५ लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यातच दि. १४ एप्रिलपर्यंत लादलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील असंघटित मजूर, कामगार देशोधडीला लागले असून त्यांना आपले घर गाठण्यासाठी हजारो कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. त्यांना ना पाणी, ना अन्न व बालकांसहित घर गाठताना त्यांची दमछाक झाली आहे. काही महिला तान्ह्या बाळासह पायपीट करताना दिसत आहेत. हजारो कि.मी.पायपीट केल्यानंतर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशी परिस्थिती का आणण्यात आली? त्याला कोण जबाबदार आहे? सरकार म्हणून जबाबदारी आहे की नाही?

चीननमध्ये कोरोनाने धूमाकूळ घातल्यानंतर भारताने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय केले? भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळमध्ये पहिला रूग्ण सापडला. मग सरकारने दोन महिने का झोपा काढल्या? जाणीवपूर्वक लोकांना मारण्याचा कट तर नाही ना? अशी शंका घ्यायला वाव आहे. 

एका बाजूला विदेशात असणार्‍या लोकांना आणण्यासाठी खास विमानाची सोय केली जाते परंतु देशातील असंटित मजूर व कामगारांना त्यांना घरी पाठवण्यासाठी सोय केली जात नाही.ना त्यांना पाणी ना अन्न. एवढेच कशाला आपल्या घरी जाणार्‍या या कामगारांना पोलीसांकडून बदडले जात आहे. विदेशातून येणार्‍या लोकांसाठी पहिल्यापासूनच विमानतळावर तपासणी केंद्र का ठेवण्यात आले नाहीत. 

विदेशातून आलेले लोक मिसळल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला. सरकार म्हणून जबाबदारी आहे की नाही. दि. १४ एप्रिलपर्यंत लॉक डाऊन केल्याने असंटित कामगार व मजुरांनी जगायचे कसे? कारण त्यांचे हातावर पोट आहे. आज कमावणार आणि पानावर खाणार त्या लोकांना जगण्याचा हक्क नाही का? अशी हालत का करण्यात येत आहे? याचा विचार करण्याची गरज आहे.

आज देशात काय झालंय की, लोकं येथील आहेत परंतु शासक विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण आहे. परंतु हे शिकल्या-सवरलेल्या लोकांच्याही लक्षात येत नाही. शिकल्या-सवरलेल्या लोकांना वाटते की भारत स्वतंत्र झाला आहे. परंतु भारत स्वतंत्र झालेलाच नाही. भारत खरोखरच स्वतंत्र झाला असता तर एवढी गुलामी कशी? भारतातील लोकांना आजही मूलभूत सुविधा का मिळत नाही? स्वतंत्र म्हटल्यानंतर लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. परंतु लोकांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. 

याचा अर्थ दि. १५ ऑगस्टला विदेशी असलेला ब्राम्हण स्वतंत्र झाला. त्याच्या हाती सारी सत्ता एकवटली. म्हणजे विदेशी इंग्रज जाऊन दुसरा विदेशी ब्राम्हण भारतीय लोकांच्या बोकांडी बसला. तो भारतीय लोकांच्या खांद्यावरून उतरायचे नावच घेत नाही. गेली साडेतीन हजार वर्षे ब्राम्हणी गुलामीत भारतीय लोक खितपत पडले आहेत. एवढे सर्व अन्याय-अत्याचार होत असताना लोकं पेटून का उठत नाहीत? त्याला कारण त्यांच्यावर ब्राम्हणांनी लादलेली गुलामी होय. कारण जो गुलाम असतो त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. जो मालक असतो तो गुलामांचा निर्णय घेतो. 

आज या देशाचा मालकच ब्राम्हण असल्याने तो गुलामी दृढ कशी होईल यासाठी काम करतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज लोकांना दवाखाने हवेत, औषधे हवीत परंतु सरकारने रामायण, महाभारत या ब्राम्हणवादाचा प्रसार करणार्‍या मालिका दाखवण्याचा निर्णय घेऊन लोकांची गुलामी आणखी दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांना या काल्पनिक मालिकांमध्ये गुंतवून ब्राम्हणी व्यवस्थेविरोधात बोलता कामा नये यासाठी ही चाल खेळण्यात आली आहे. 

कारण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या ३३ कोटी देवांपैकी एकही देव कामाला आला नाही. कामाला आले ते डॉक्टर, दवाखाने व विज्ञान होय. मालिका दाखवण्याचा खटाटोप म्हणजे पुन्हा एकदा लोकांना दैववादाकडे वळवून ब्राम्हणी व्यवस्थेची खुंटी बळकट करण्याचा प्रयत्न आहे. देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला आमची कळकळीची विनंती आहे, की हे ब्राम्हणी षड्यंत्र जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमचा सत्यानाश अटळ आहे. 

विद्रोह करायचा असेल तर मूलनिवासी बहुजन समाजातील जे क्रांतीकारक होऊन गेले त्यांचेच विचार वाचा, ऐका. रामायण, महाभारत पाहिले तर ना राम वाचवायला येणार ना पाच पांडव. त्यामुळे सद्सद्विवेकबुध्दी जागृत ठेवून व तर्काच्या आधारावर स्वत:ला घासून-पुसून घ्या. खरं आणि खोटं काय याची पडताळणी करा. 


तर्काच्या कसोटीवर एखादी गोष्ट पटली तरच ती स्विकारा. तर्क आणि विज्ञानाची सांगड घाला. कारण विज्ञानच या जीवनाचा आधार आहे. तोच कुठल्याही संकटावर मात करू शकतो. त्यामुळे लोकांनी ब्राम्हणी व्यवस्था समजून घेण्याची गरज आहे. ज्यांच्याविरोधात लढायचे आहे त्यांचेच सरकार केंद्रात असल्याने ते गरीबाला जगून देतील का? कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आणखी तीन महिने लॉक डाऊन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मग लोकांनी उपासमारीने मरा. म्हणून लोकांनी या व्यवस्थेविरोधात पेटून उठण्याची गरज आहे. आज पेटून उठला नाहीत तर ही व्यवस्थाच तुम्हांला पेटवायला निघाली आहे. परंतु लोकं कधी पेटून उठणार हाच भलामोठा प्रश्‍न आहे.
 
दिलीप बाईत
९२७०९६२६९८

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ हजार ३८४ जणांवर बेकारीची कुर्‍हाड
विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा का
हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बां
आधीच भारतात ८३ कोटी लोक उपासमारीत त्यात आणखी १ कोटी २० ला
कपिल मिश्राचे विधान लोकांना भडकावणारेच होते
उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper