×

कोरोना मदतीच्या नावावर चीन करतोय कमाई, स्पेनला विकली ३४५६ कोटींची वैद्यकीय उपकरणे

Published On :    30 Mar 2020
साझा करें:

ज्या चीनने जगभरात कोरोना व्हायरस पसरवला तोच चीन आज मदतीच्या नावाखाली करोडो रूपयांची कमाई करताना दिसत आहे. चीनने स्पेनला ३४५६ कोटींची वैद्यकीय उपकरणे विकत आपला खरा चेहरा जगासमोर आणला आहे.



बिजिंग: ज्या चीनने जगभरात कोरोना व्हायरस पसरवला तोच चीन आज मदतीच्या नावाखाली करोडो रूपयांची कमाई करताना दिसत आहे. चीनने स्पेनला ३४५६ कोटींची वैद्यकीय उपकरणे विकत आपला खरा चेहरा जगासमोर आणला आहे.


अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इराणची अवस्था सर्वात वाईट आहे. आतापर्यंत १,२३,७८० लोकांना यूएस आणि इटलीमधील ९२,४७२ लोकांना संसर्ग झाला आहे. स्पेनमध्ये संक्रमितांची संख्या वाढून ७३,२३५ झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार करणार्‍या चीनने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 


केवळ हुबेईच नव्हे तर वुहान शहरातही निर्बंध हटविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाचे डोळे चीनवर खिळले आहेत. या परिस्थितीवर चीनने मात कशी केली. तसेच चीन अन्य देशांना कशी मदत करू शकेल. याचा फायदा घेत आता चीनने कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदतीच्या नावाखाली व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे.


मदतीच्या नावाखाली चीनने स्पेनला ३४५६ कोटींची वैद्यकीय उपकरणे मोठ्या प्रमाणात विकली आहेत. परंतु ही उपकरणे निकृष्ठ दर्जाची आहेत. सध्या स्पेन, इटली, फ्रान्स आणि जपानसारख्या अमेरिकेशी जवळचे देश मदतीसाठी चीनकडे पहात आहेत. 


चीनला आरोपांचा सामना करावा लागत असला तरी अशा परिस्थितीत नफा मिळविणे त्यांनी सुरू केले आहे.  फॉक्से न्यूजच्या अहवालानुसार चांग म्हणतात, चीन वैद्यकीय उपकरणे दान करीत असल्याचे हे जगाला दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे, तर प्रत्यक्षात तसे नाही. वास्तविक, ती सर्व उपकरणे संबंधित देशांना विकली जात आहेत.


स्पेनचे आरोग्य मंत्री सैल्वाकडोर इला यांनी बुधवारी जाहीर केले की, चीनकडून ३४५६ कोटींची वैद्यकीय उपरकरणे खरेदी करण्यात आली. त्यात ९५० व्हेंटिलेटर, ५५ लाख टेस्टिंग किट, १.१ करोडचे ग्लोव्हज, ५० करोडचे मास्क खरेदी करण्यात आले होते. त्यामध्ये निकृष्ठ गुणवत्तेमुळे चीनला ९ हजार कोरोना टेस्ट किट परत करण्यात आल्या. स्पेनला देण्यात आलेले किट चिनी कंपनी बायोईजीकडून खरेदी करण्यात आले होते. परंतु या चिनी कंपनीला अद्याप कोरोना टेस्टो किट्स बनविण्याचा परवाना देण्यात आलेला नव्हता याची कबुली चीनने दिली आहे. 


सध्या इटली चीन, रशिया आणि क्युबाकडून मदतीची विनंती करीत आहे. मार्चच्या मध्यभागी अनेक चिनी दल इटलीला पोहोचले. त्यांनी इटालियन सरकारला सांगितले की त्यांचे लॉकडाउन खूप कमकुवत आहे. इटलीने चीनशी सल्लामसलत केल्यानंतर नियम अधिक कडक केले. चीनने इटलीला जहाजाद्वारे वैद्यकीय पुरवठा केला. 


चीनबरोबर रशियादेखील यामध्ये मागे नाही. ते वैद्यकीय उपरकरणे विकण्यात दुसर्‍या क्रमांकावर आहेत. रशियानेही अमेरिकेच्या जवळच्या देशांना मदत पाठविणे सुरू केले आहे.  फ्रान्सलाही चीनने वैद्यकीय पुरवठा केला आहे. चिनी दूतावासाने १८ मार्च रोजी केलेल्या ट्विटने पुरवठा केल्याची पुष्टी केली. या पुरवठ्यात फेस मास्क, मेडिकल ग्लिब आणि संरक्षणात्मक द्रव फ्रान्समध्ये नेण्यात आले. सध्या चीन दररोज ११.६ करोड फेस मास्क बनवित आहे, ते आतापर्यंतच्या क्षमतेपेक्षा १२ पट जास्त आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या गुणवत्तेविषयी प्रश्‍न उद्भवू शकतात.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कमाईपेक्षा अधिक द्यावा लागला रिफंड
भारतात १ हजार ४०४ लोकसंख्येमागे केवळ १ डॉक्टर, १.७ नर्सेस
एअर इंडिया जाणार टाटा ग्रुपच्या घशात?
भडकाऊ व समाजात द्वेष पसरवणारे टीव्हीवरील डिबेट्स थांबव
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश
‘ईडी’चा मोर्चा सुशांतच्या सहकार्‍यांकडे
दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबर म
१ हजार कोटींच्या हवाला रॅकेटचे चीन कनेक्शन, आयकर विभागा
१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू
आत्मनिर्भरचा वाजला बोर्‍या
‘पीएनबी’ घोटाळ्यात राजेश जिंदाल या ज्येष्ठ अधिकार्‍याल
स्वत: विदेशी असलेल्या मोहन भागवतांनी चीनची उचलून धरली तळ
आता महाराष्ट्र बँकेने बड्या कर्जदारांचे ७ हजार ४०२ कोटी
आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा खोडा
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात देश
नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता लागणार १९५१ प
सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला ५०० कोटींचा फटका
मराठा आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मद
भाजपच्या जवळचे उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स जि
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper