×

स्थलांतरीत कामगारांना चक्क केमिकलयुक्त पाण्याची अंघोळ, अमानवी कृत्याचा निषेध, उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार

Published On :    30 Mar 2020
साझा करें:

स्थलांतरीत आणि मजूरांना आहे त्याचजागी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थलांतरी आणि एकाच ठिकाणी जमलेल्या मजूरांना चक्क केमिकलयुक्त (सॅनिटाझरयुक्त) पाण्याने अंघोळ घालण्यात आली. याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.



मुंबई: स्थलांतरीत आणि मजूरांना आहे त्याचजागी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थलांतरी आणि एकाच ठिकाणी जमलेल्या मजूरांना चक्क केमिकलयुक्त (सॅनिटाझरयुक्त) पाण्याने अंघोळ घालण्यात आली. याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.  


प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, सरकारी यंत्रणांकडून मजूर आणि स्थलांतरीतांच्या अंगावर चक्क केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे. प्रियंका यांनी याप्रकराबद्दल उत्तर प्रदेशातील योगी सरकारला लक्ष्य केले आहे. कृपा करुन असे अमानवी कृत्य करु नका, आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. 


हे पण वाचा : हॉंगकॉंग निदर्शकांवर सोडले जाणार होते कोरोना जैविक अस्त्र, चीनच्या गुप्तचर अधिकार्‍याच्या गौप्यस्फोटाने खळबळ



कामगारांनी अगोदरच खूप सहन केलंय. अशा केमिकलयुक्त पाण्याने त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता जास्त असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी प्रियंका गांधींचे ट्विट रिट्विट करत, मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत असल्याचे म्हटले आहे. तसेच, या अमानवी कृत्याचा मी निषेध करतोय, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


दरम्यान, मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गोरीहार येथील पोलिसांनी लॉकडाऊनच उल्लंघन करणार्‍या नागरिकांवरही अशीच अमानवी कारवाई केली होती. येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाने एका कामगार मुलाच्या कपाळावर, मैने लॉकडाऊन का उल्लंघन किया है.. मुझसे दूर रहना.. असा संदेशच काळ्या शाईने लिहिला. त्यानंतर, या महिला पोलीस उपनिरीक्षकावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. 


याबाबत प्रतिक्रिया देताना, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांनी, संबंधित महिला पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येईल, हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे म्हटलंय. सध्या सोशल मीडियात उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओसह योगी सरकारवर टीकाही करण्यात येत आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper