×

लॉकडाऊनमुळे सुरक्षा उपकरणांत कमी, डॉक्टरांच्या जीविताला धोका

Published On :    30 Mar 2020
साझा करें:

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे तर दुसरीकडे सरकारी रुग्णालयात (पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचा तुटवडा भासत असल्याचं दिसून येत आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. कारोना विरोधात लढाई लढण्यासाठी या उपकरणांची उणीव असल्याने डॉक्टरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.



नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे तर दुसरीकडे सरकारी रुग्णालयात (पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचा तुटवडा भासत असल्याचं दिसून येत आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. कारोना विरोधात लढाई लढण्यासाठी या उपकरणांची उणीव असल्याने डॉक्टरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पीपीई पर्सनल प्रोटेक्टिव गियर म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरण असतं. एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. पीपीई या शब्दाचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जातो. डॉक्टर्स, नर्स आणि बाकी आरोग्य कर्मचार्‍यांसाठी कोरोनापासून वाचण्यासाठी ग्लव्स, मास्क, चष्मा आणि सूट ही उपकरणं पीपीई असतात. पीपीई किटमुळे संक्रमित व्यक्तीच्या उपचारावेळी डॉक्टर्स, नर्स आणि उर्वरित कर्मचार्‍यांना संक्रमण होत नाही, ते सुरक्षित राहतात.

अनेक ठिकाणी पीपीई किटची कमकरता असल्याने आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षेविना काम करणं भाग पडत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने अशात काम करणं धोकादायक आहे. कोरोना संक्रमण वार्‍याच्या गतीने पसरत आहे. त्यासाठी रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. हा धोका लक्षात घेता डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी आंदोलनही केलं आहे.

पटनाच्या नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डॉक्टर रवि रंजन कुमार रमन यांनी सांगितले की, तुम्ही सैनिकांना बंदूकीविना युद्ध लढायला सांगू शकता का? कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांनाही अशाप्रकारे काम करायला लावणं धोक्याचं आहे. ५ राज्यात १२ पेक्षा अधिक डॉक्टर्स कोरोना व्हायरसच्या संक्रमणात आले आहेत. पीपीई उपकरणाची कमी असल्याने डॉक्टरांच्या जीवाला धोका झाला आहे.
एचएलएल सूत्रांच्या माहितीनुसार पीपीई किट उपकरण बनवण्यासाठी लघू आणि मध्यम उद्योग कच्चा माल तयार करतात. तो एचएलएलला पाठवतात. अनेक क्षेत्रातील उपकरणांना जोडून ही किट तयार केली जाते. लॉकडाऊनमुळे या क्षेत्राकडून उपकरणं येण्यास उशीर होत आहेत. त्यामुळे पीपीई किट बनवण्यात विलंब होत आहे.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
भाजपा सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगि
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा, सेव
अमेरिकेतील आंदोलनाने भारतातील घुसखोर ब्राम्हणांना जाग
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper